Prajakta Mali Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Movie: प्राजक्ता माळी का झाली 'फुलवंती'ची निर्माती? मनातली भावना बोलून दाखवली!

Prajakta Mali Phullwanti Movie: प्राजक्ता माळी निर्मित फुलवंती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुलाखती दिली आहे.

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मनोरंजनविश्वात स्वत:ची अनोखी छाप उमटवली आहे. अभिनेत्री, निवेदीका, व्यवसायिका असण्यासोबत आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने निर्मितीक्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. प्राजक्ता माळी निर्मित फुलवंती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुलाखती दिली आहे.

प्राजक्ता माळीने सकाळ प्रिमियर चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट निर्मितीक्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितले आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीला नृत्याची विशेष आवड आहे. लहानपणापासून भरतनाट्यम क्षेत्रात नावलौकिक केल्याने चित्रपटात नृत्याची मुख्य भूमिका असावी अशी प्राजक्ताची इच्छा होती.

मुलाखती दरम्यान प्राजक्ता माळीला, तु एक उत्तम नृत्यागंणा आहे. आणि आता पडद्यावर ही नृत्यकला सादर करण्याची इच्छा कशी निर्माण झाली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत प्राजक्ताने,मराठी चित्रपटांमध्ये नृत्यकला फारशी सादर केली जास्त नाही. मी एक नर्तिका आहे. यामुळे नर्तिका ही उत्तम कला आहे. ती चित्रपटात सादर कशी करता येईल याचा मी विचार केला आणि फुलवंती चित्रपटातून ती सादर करणार आहे.

प्राजक्ता माळी निर्मित सांगितीक नजराणा असलेला फुलवंती चित्रपट प्रेक्षकांसाठी खास असेल.प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्यासह चित्रपटात प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले हे कलाकार दिसणार आहेत. ११ ऑक्टोबर सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT