Prajakta Gaikwad Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Gaikwad Wedding: 'स्वतःला शिव पार्वती...'; रॉयल लग्नातल्या 'त्या' व्हिडीओमुळे प्राजक्ता प्रचंड ट्रोल, नेमकं प्रकरण काय?

Prajakta Gaikwad Wedding: प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांच्या नंदीवरील रिसेप्शन एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर टीका होत आहे. धार्मिक भावनांचा अपमान केल्याची चर्चा सुरु आहे.

Shruti Vilas Kadam

Prajakta Gaikwad Wedding Troll: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योजक-पैलवान शंभूराज खुटवड यांचा काल शाही विवाह सोहळा संपन्न झाला. लग्ननानंतर रिसेप्शन सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. मात्र या नविन कपलच्या एन्ट्रीच्या स्टाईलमुळे आता दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

काय घडले?

रिसेप्शनमध्ये नवविवाहित जोडीने एक वेगळी आणि लक्षवेधी पद्धतीने एन्ट्री केली. प्राजक्ता आणि शंभूराज यांनी नंदी बैलावर बसून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. त्यांच्या सभोवती रोषणाई, संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी दिसत होती. ही एन्ट्री पाहुण्यांना फार आवडली आणि पाहताक्षणी सर्वांचे लक्ष या कपलकडे गेले.

मात्र, या भव्य प्रवेशानंतर एक व्हिडिओ समोर आला ज्यात नंदीच्या पुढे भगवान शंकराचा वेश परिधान केलेला एक व्यक्ती चालत आहे, आणि त्यामागे नंदीवर बसलेली नववधूवर अशी रचना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचला आहे.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. अनेकांनी हा प्रकार असंवेदनशील असल्याचे म्हटले. एका नेटकऱ्याने लिहिले, “देवांची खिल्ली उडवणारा प्रकार आहे हा.” दुसऱ्याने लिहिले, “लग्न आहे की नाटक? महादेवांना पुढे चालवून स्वतः नंदीवर बसणे चुकीचेच.”आणखी एकाने लिहिले,“थाटासाठी लोक कितीही पुढे जातात. ''स्वतःला शिव पार्वतीच समजायला लागतात का?” तरीही काही चाहत्यांनी जोडप्याच्या भव्य रिसेप्शनचे कौतुकही केले आणि हा फक्त कलात्मक सादरीकरणाचा भाग असल्याचे म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT