Pallavi Joshi  saam tv
मनोरंजन बातम्या

बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर पल्लवी जोशींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'मी काही...'

बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्लॉप ठरू लागल्याने मनोरंजन क्षेत्रातील वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

pallavi Joshi News : बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी कलाकारांना यंदाच्या २०२२ वर्षी अपयशाला सामोरे जावं लागलं. नुकतेच प्रदर्शित झालेले सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकले नाहीत. आमिर खानचा 'लाल सिंह चढ्ढा' किंवा रणबीर कपूरचा 'शमशेरा' सिनेमा प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला नाही. बॉलिवूडमधील (Bollywood) बड्या अभिनेत्यांचे चित्रपट प्लॉप ठरू लागल्याने मनोरंजन क्षेत्रातील वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी भाष्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल दाखवू शकले नाहीत. काही महिन्यांपूर्वी विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने जोरदार कमाई केली. 'द कश्मीर फाइल्स'मधील अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी बॉलिवूडमधील सिनेमे फ्लॉप का होत आहे ? यावर भाष्य केलं आहे. पल्लवी जोशी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'मी काही तज्ज्ञ नाही. त्यामुळे मला माहित नाही की, 'शमशेरा' , 'दोबारा' किंवा अन्य सिनेमांबरोबर काय झालं ?. मी नेहमी या बाबीवर विश्वास ठेवते की, आपण ज्या हेतूने विषय मांडतो आणि सादरीकरण करतो हे प्रेक्षकांना त्याची जाणीव असते.

'जेव्हा माझं कामावर लक्ष नसायचं, तेव्हा प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. तो माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ होता. या सिनेमांसोबत देखील असंच होत आहे'.

बायकॉट ट्रेंडवर पल्लवी जोशी म्हणाल्या ?

बॉलिवूडच्या बायकॉट ट्रेंडवर देखील पल्लवी जोशी यांनी परखड मत मांडलं आहे. 'देशात एवढी मोठी चळवळ सुरू असेल, तर त्याचा विचार केला पाहिजे. प्रेक्षक हेच आपल्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्याविना आपण काहीच नाही. त्यामुळे त्यांना जे हवं आहे, ते त्यांना दिलं पाहिजे. ज्या कथा त्यांना आवडतात, त्यांना त्या प्रकारच्या कथा द्यायला हव्या. तेव्हाच प्रेक्षक सिनेमागृहात येतील. आमचा 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला, कारण आम्ही सिनेमातून वास्तव दाखवलं. सध्या सिनेमा आणि प्रेक्षकांची नाळ तुटली आहे. हे देखील सध्या बॉलिवूडमधील चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण असू शकतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

SCROLL FOR NEXT