Actress Kishori Shahane cooking food  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kishori Shahane Video: मग आज काय बेत? चुलीवरची भाकरी अन् तळलेले मासे, अभिनेत्रीने चाहत्यांना दिलं आग्रहाचं आमंत्रण

Kishori Shahane: किशोरी शहाणे यांनी चुलीवर जेवण करतानाता व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Kishori Shahane Invited Fans For Lunch:

अभिनेत्री किशोरी शहाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या नेहमीच त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच किशोरी यांनी त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांचे पती दीपक विज यांनी शूट केला आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे त्यांच्या फार्म हाऊसवर गेल्या आहेत. त्यांच्या फार्म हाऊसवरील त्यांनी भाज्यांची शेती केली आहे. शेतातील ताज्या आणि ऑरगॅनिक भाज्यांचा आस्वाद किशोरी घेत आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किशोरी शहाणे चुलीवर जेवण बनवत आहेत.

किशोरी शहाणे यांच्या या व्हिडीओमध्ये त्या भाकरी थापत आहेत. त्यानंतर त्या भाकरी चुलीवर भाजताना देखील दिसत आहेत. त्यांच्यासमोर तळलेली मासे देखील ठेवले आहेत. भाकरी भाजून झाल्यानंतर किशोरी 'मस्त हा मस्त' असं देखील म्हणत आहेत. तसेच चाहत्यांना जेवला येण्याचा आग्रह देखील त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.

किशोरी शहाणे यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'चुलीवरच्या ऑरगॅनिक जेवणाविषयी तुमचं काय मत आहे? मच्छी आणि नाचणीची भाकरी.' तसेच किशोरी यांनी पती दीपक यांचे व्हिडीओ शूट केल्याबद्दल आणि व्हिडीओ बनविण्याचे सुचविल्याबद्दल आभार मानले आहे.

किशोरी शहाणे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. त्यांना चुलीवर जेवण बनवताना पाहून आश्चर्य व्यक्त करत त्यांचे कौतुक देखील केले आहे.

किशोरी शहाणे मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहेत. ९० दशकं किशोरी शहाणे यांनी गाजवलं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी देखील त्या खूप फिट आहेत आणि सुंदर दिसतात. सध्या किशोरी शहाणे स्टार प्लसवरील 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. नुकतेच या मालिकेने १००० एपिसोडचा पल्ला पार गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT