Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; कोर्टाने पाठवलं समन्स

पटियाला कोर्टाने हे समन्स बजावलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jacqueline Fernandez Court Summons : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला आता कोर्टाने समन्स बजावलं आहे. माहितीनुसार पटियाला हाऊस कोर्टाने हे समन्स बजावलं असून तिला 26 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. (Jacqueline Fernandez Latest News)

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आलं होतं. ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी तिचे नाव जोडलं गेले होते.

काही दिवसांपूर्वी ईडीने जॅकलिनची चौकशी सुद्धा केली होती. त्यानंतर ईडीने तिच्यावर 2015 कोटींचं आरोपपत्रही दाखल केलं होतं. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र स्वतः वर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं.

आरोपपत्रात सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती, असा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, आता पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलिनला समन्स बजावलं असून तिला 26 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी; १०-१२ जण जखमी... वाहनातून गणेश मूर्ती पडली

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT