Hruta Durgule Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृताच्या घरी नवीन पाहुणा कधी येणार? प्रेग्नेंसीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Hruta Durgule Pregnancy: अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून घराघरांत ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे कायम चर्चेत असते. हृताने मालिकेतील तिच्या दर्जेदार भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. महाराष्ट्राची क्रश म्हणून हृता दुर्गुळेला ओळखले जाते. मागील काही दिवसांपासून हृता छोट्या पडद्यापासून दूर आहे. अशातच अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

हृता प्रतिक शाहबरोबर 18 मे 2022लग्नबंधनात अडकली. यानंतर ती जास्त मालिकेत दिसली. अनेकदा चाहत्यांनी देखील तिला कमेंट्सच्या माध्यमातून विचारले. नुकंतच दिलेल्या एका मुलाखतीत हृताने फॅमिली प्लॅनिंगबद्दल सांगितले. हृता म्हणाली, "सध्यातरी आम्ही काहीच प्लान केला नाही... गो विथ द प्लो या गोष्टीवर आमच्या दोघांचाही विश्वास आहे. आम्ही विचार केलेल्या गोष्टी खूप चांगल्या होत्या."

"दुर्वा" या मालिकेतून हृताने मनोरंजनविश्वात पदार्पण केले. यानंतर "फुलापाखरू" या मालिकेतून हृताला खरी ओळख मिळाली. "मन उडू उडू झालं" या सारख्या मालिकांमध्ये हृता दिसली. "अनन्या", "टाईमपास ३' या चित्रपटात तिने काम केले आहे. सध्या अभिनेत्री हिंदी प्रोजक्टमध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT