Hansika Motwani Bachelor Party Video Instagram @ihansika
मनोरंजन बातम्या

Hansika Motwani: 'ब्लेस मी विथ बेस्ट' म्हणत अभिनेत्री हंसिका मोटवानीने शेअर केला बॅचलरेट पार्टीचा व्हिडिओ

हंसिका आणि सोहेलचे लग्न ४ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.

Pooja Dange

Hansika Motwani Wedding Update: अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी मुंबईत माता की चौकीचे आयोजन केले होते. या पूजेत केवळ तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते. माता की चौकीनंतर हंसिकाने बॅचलोरेट पार्टी करताना दिसत आहे. ज्याचा व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

हंसिका मोटवानीने तिच्या इंस्टाग्रामवर बॅचलर पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलींच्या गँगसोबत मस्ती करत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री मुलींच्या गँगसोबत सुंदर लोकेशन एक्सप्लोर करत आहे. अभिनेत्रीने निवडलेले हे सुंदर लोकेशन ग्रीस आहे. डान्ससह वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करत हंसिका आणि तिच्या मैत्रिणी बॅचलोरेट पार्टीचा आनंद घेत आहेत. (Social Media)

व्हिडिओमध्ये हंसिकाने पांढरा शर्ट, सिल्व्हर कलरचा शॉर्ट स्कर्ट आणि पांढरे शूज घातले आहेत. तसेच तिने अ‍ॅक्टिव्हिटीनुसार कपडे बदलले आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये 'दिन शगना दा' हे गाणे वाजत आहे. लग्नानंतर हंसिका मोटवानी नॉर्दर्न लाइट्स पाहण्यासाठी सोहेल कथुरियासोबत हनीमूनला जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून हंसिकाच्या बकेट लिस्टमध्ये नॉर्दर्न लाइट्सचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. (Celebrity)

हंसिका आणि सोहेलचे लग्न ४ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. हंसिकाच्या लग्नापूर्वीचे मेहेंदी आणि संगीत हे कार्यक्रम 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. तर 2 डिसेंबरला सुफी नाईटचेही आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

Jio Special Offer: जिओची सुपरहिट ऑफर! ३३६ दिवसांसाठी सिम अ‍ॅक्टिव्ह राहील, Unlimited कॉलिंगसह धमाल बेनिफिट्स

Maharashtra Cough Syrup Alert : यवतमाळ हादरलं! विषारी कफ सिरपमुळे ६ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात संतापाची लाट

Bhandara Tourism : घनदाट जंगल अन् उंच डोंगरांमध्ये वसलाय किल्ला, दिवाळीत भंडारा जिल्ह्यात ट्रिप प्लान करा

Pune : पुण्यात खाकीच असुरक्षित, वाहतूक पोलिसाला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं

SCROLL FOR NEXT