Esha Gupta On Women Reservation Bill Saam Tv
मनोरंजन बातम्या

Esha Gupta On Women Reservation Bill: इशा गुप्ता राजकारणात येणार? महिला आरक्षणावर केलं मोठं वक्तव्य

Esha Gupta News: महिला आरक्षण विधेयक सादर झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Esha Gupta On Women Reservation Bill

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असं या विधेयकाला नाव देण्यात आलं आहे. महिला आरक्षण विधेयक सादर झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान इशा गुप्ताने ANI सोबत संवाद साधला. इशा गुप्ता म्हणाली, “पंतप्रधानांनी हे विधेयक सादर केल्यामुळे खूप चांगली गोष्ट झाली आहे. हा विधेयक म्हणजे देशासाठी एक प्रगतीशील विचार आहे. या आधीही अनेकदा पंतप्रधानांनी देशातल्या नागरिकांसाठीच नाही तर महिलांसाठीही उत्तमोत्तम योजना आखल्या आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या सारख्या अनेक योजना मोदी सरकारने महिलांसाठी राबवल्या आहेत. या आरक्षण विधेयकामुळे महिलांना समान अधिकार मिळणार आहे.”

अभिनेत्री पुढे मुलाखतीत बोलली, “असं म्हटलं जातं की, ज्या घरामध्ये लक्ष्मी आनंदित असते, ते घर कायमच आनंदी असते. घर आनंदित ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी याची सुरुवात लक्ष्मीपासून केली आहे. आपला देश नक्की पुढे जाईल. हे विधेयक म्हणजे देशासाठी फार महत्वाची बाब आहे. ज्या गोष्टीचा फक्त विचार केला जातो, ती गोष्ट मोंदींनी थेट करुन दाखवली आहे. या विधेयकामुळे देशातल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.”

जेव्हा अभिनेत्रीला निवडणूक लढवणार आहेस का? असे विचारण्यात आले त्यावेळी अभिनेत्रीने आपल्याला राजकारणात यायचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आता अभिनेत्री कुठून निवडणूक लढवणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती लवकरची बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवसोबत एका गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT