Disha Patani saam tv
मनोरंजन बातम्या

Disha Patani : दिशा पटानी 'या' कारणामुळं झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'उर्फी जावेद पार्ट २'

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ड्रेसिंग सेन्सचे जेवढे कौतुक केले जाते, तितकेच त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या(Fashion) फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ड्रेसिंग सेन्सचे जेवढे कौतुक केले जाते, तितकेच त्यांना ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. आता बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी(Disha Patani) ट्रोल झाली आहे. अलीकडेच अभिनेत्रीला टाइट-फिटिंग व्हाईट क्रॉप शर्ट परिधान केल्याबद्दल ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर एका नेटिझन्सने तिला 'उर्फी जावेद पार्ट-२' म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिशा पटानी वृत्तांकन करणाऱ्यांना शुभेच्छा देताना आणि पोज देताना दिसत आहे. दिशा पटानी हिने निळ्या बॅगी पॅन्टसह मिड-स्लिट टाइट व्हाइट क्रॉप शर्ट परिधान केला होता. अभिनेत्री तिच्या काही मित्रांना मिठी मारून तिच्या कारकडे जाताना या व्हिडीओमध्ये ती दिसत आहे.

दिशा पटानीला ट्रोल करताना एका यूजरने लिहिले 'कोणीतरी तिला सांगा की तिने घातलेला शर्ट तिच्या साइजचा नाही'. एका नेटिझनने तिची उर्फी जावेदशी तुलना करत म्हटले' उर्फी जावेद पार्ट २', तर दुसर्‍या यूजरने म्हटले की, 'तिने पूनम पांडेला कॉपी केला आहे'. आणखी एका नेटिझनने म्हटलं की, 'असे वाटते हिला उर्फीशी स्पर्धा करायची आहे'.

दिशा पटानीचा एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटाच्या रिलीजव्यतिरिक्त, दिशा पटानी अलीकडेच अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत होती. लग्नाच्या विषयामुळे दिशा ६ वर्षांच्या डेटिंगनंतर टायगरपासून वेगळे झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Haldi : हळदीत रंगले स्मृती-पलाश; टीम इंडिया बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT