Dia Mirza Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dia Mirza: दिया मिर्झाच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

दिया मिर्झाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या (Dia Mirza) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबद दियाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दिया मिर्झाची भाची आणि काँग्रेस नेते फिरोज खान यांची मुलगी तान्या काकडेचं निधन झालं आहे. दिया मिर्झाने तिच्या पोस्टमध्ये मृत्यूचे कारण सांगितलेले नाही, परंतु तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून असे समजते की ती तिच्या भाचीच्या खूप जवळ होती आणि तिच्या जाण्याने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. तान्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

हे देखील पाहा -

दिया मिर्झाने आपल्या भाचीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये दियाची भाची हसताना दिसत आहे, तर अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

माझी भाची, माझं बाळ आणि माझं मुल आता या जगातच नाही. तू जिथे कुठे असशील तिथे तुला प्रेम आणि शांती मिळो. तू नेहमीच आम्हाला हसवलंस. तू जिथे असशील तिथे तुझं नाचणं, हसणं आणि गाण्याने आनंद बहरेल. ओम शांती.” असं म्हणत दियाने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. दियाच्या या पोस्टनंतर अर्जुन रामपाल, गौहर खान, फराह अली खान, रिद्धीमा कपूर यांसारख्या कलाकार मंडळींनी कमेंट केल्या आहेत. या मंडळींनी कमेंट करत दियाच्या भाचीला श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT