Abhijeet Bichukle Saam Tv
मनोरंजन बातम्या

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीनं बांधली लगीनगाठ; सोशल मीडियावर चर्चा मात्र अभिजीत बिचकुलेंची, Video Viral

देवोलिन आणि शाहनवाज राहिले बाजूला लोकांना अभिजीत बिचुकले यांची आठवण येऊ लागली आहे.

प्रविण वाकचौरे

मुंबई : हिंदी टेलिव्हिजवरील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने 14 डिसेंबर म्हणजेच काल गुपचूप आपलं लग्न उरकलं आहे. देवोलिनाने जीम ट्रेनर असलेल्या शाहनवाज शेखसोबत लग्न केलं आहे. देवोलीनाचे लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान देवोलिन आणि शाहनवाज राहिले बाजूला लोकांना अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांची आठवण येऊ लागली आहे.

काय आहे प्रकरण?

अभिजीत बिचुकले जिथे जातात तिकडे हवा करतात, हाच त्यांचा अंदाज. मराठी बिग बॉस गाजवल्यानंतर त्यांनी बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. या सीझनमध्ये त्यांची गाठ देवोलीना भट्टाचार्जीशी पडली. ती देखील बिग बॉसच्या घरात होती.

बिचुकले आणि देवोलिना यांची शोमध्ये चांगली मैत्री झाली होती. बिचुकलेंना घरात देवोलिना खूप आवडायची. बिचुकले सतत देवोलीनाच्या मागे पुढे असायचे. अनेकवेळा दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे. पण बिचुकले देवोलेनाचीही मनधरणी करत असत. (Entertainment News)

लग्नानंतर देवोलीना आणि बिचुकलेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देवोलीना आणि बिचुकलेंचे अनेक शॉर्ट्स एकत्र करून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यूजर्स या व्हिडिओवर अनेक कमेंट आहेत.

कोण आहे शाहनवाज?

देवोलिना बऱ्याच दिवसांपासून जिम ट्रेनर शाहनवाजला डेट करत होती. रिपोर्टनुसार, शाहनवाज देवोलीनाच्या घराजवळील जिममध्ये ट्रेनर आहे. साथ निभाना साथिया सीरियलदरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला तेव्हा शाहनवाजने तिला खूप मदत केली. त्याचवेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. देवोलीना आणि शाहनवाज यांच्या नात्याबद्दल बहुतेकांना माहिती नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT