Athiya Shetty Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Athiya Shetty Birthday: कॉमन फ्रेंडमुळे भेट मग मैत्री नंतर लग्न; अथिया आणि के. एल राहुलचं जुळलं कसं, लव्हस्टोरी वाचा

Athiya Shetty Lovestory: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. २०१५ मध्ये सूरज पांचोलीसोबत 'हिरो' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. ‘हीरो’ची निर्मिती अभिनेता सलमान खानने केली असली तरी'हीरो' बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. अभिनयासह अथिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली.

२३ जानेवारी २०२३ मध्ये अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले. लग्नापूर्वी दोघेही गेल्या तीन वर्षापासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनीही काही दिवस त्याचं नात गुपित ठेवले होतं. मात्रा अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले. राहुल आणि अथिया शेट्टीची लव्हस्टोरी खूप खास आहे.

२०१९ मध्ये अथिया आणि राहुलची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडमुळे झाली. पहिल्या भेटीत दोघेही एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर भेटणं सुरू झाल्या. हळूहळू यांच्यात मैत्री झाली. आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याचदरम्यान दोघेही त्यांच्या मित्रांसह थायलंडमध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेले होते हे फोटो देखील व्हायरल झाले होते.

सोशल मीडियावर पहिल्यांदा दोघांनीही एकमेकांच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या तेव्हा या दोघांचे नाते स्पष्ट झाले. त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा सुरू झाली. दरम्यान २०२१ मध्ये राहुल कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचला तेव्हा अथियाही त्याच्यासोबत होती. दोघांच्या फोटोंनी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खर्डी – उंबरमळी स्टेशनमध्ये रुळाजवळील कोरड्या गवताला आग

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

SCROLL FOR NEXT