Anjali Arora Compared To Sai Pallavi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anjali Arora Debut Bollywood : ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; थेट सीतेची भूमिका साकारणार

Anjali Arora Compared To Sai Pallavi : ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरा दिग्दर्शक अभिषेक सिंग यांच्या ‘श्री रामायण कथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Chetan Bodke

नितेश तिवारी ‘रामायण’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. सध्या चित्रपटाची जोरदार शुटिंग सुरू असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता ‘रामायण’नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘श्री रामायण कथा’ नावाचा चित्रपट येत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक सिंग करणार असून चित्रपटाबद्दलची महत्वाची अपडेट समोर आली आहे. ‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोरा चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून ती बॉलिवूड डेब्यू करणार आहे. याबद्दलचे वृत्त स्वत: अंजलीने दिले आहे.

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, "माझी तुलना बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केला जात असल्याचा मला आनंद आहे. दिग्दर्शकांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, माझ्यासोबतच त्यांनी इतर काही अभिनेत्रींना शॉर्टलिस्ट केले होते. मी सीतेची भूमिका अगदी व्यवस्थित साकारेल, असा त्यांना माझ्यावर विश्वास होता. म्हणूनच त्यांनी माझी निवड केली. सीतेच्या भूमिकेसाठी त्यांनी मला गेल्या महिन्यातच फायनल केलं."

मुलाखतीमध्ये अभिनेत्री पुढे म्हणाली, "मला या भूमिकेसाठी फायनल केल्यापासून भूमिकेसंबंधित मी काही व्हिडीओ पाहतेय आणि कार्यशाळेमध्येही सहभाग घेतेय. भूमिकेबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा मी प्रयत्न करते. दिग्दर्शकांनी मला या भूमिकेसाठी कसं काय निवडलं आहे ?, असा मला नेहमीच प्रश्न पडतो." इतर अभिनेत्रींसोबत होणाऱ्या तुलनेबद्दल अंजली म्हणाली, " नेहमीच तुलना होते, हे मला माहित आहे. माझी तुलना कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत केली जात आहे, याचा मला आनंदच होईल."

अंजली अरोरा सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे. "कच्चा बदाम" गाण्यावरील अंजलीचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर "लॉकअप" या रिॲलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला. अंजलीचे इन्स्टाग्रामवर १३ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT