Ananya Pandey May collab With Janhvi Kapoor, Sara Ali Khan Lead Role Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ananya Pandey: “आमच्या तिघींमध्ये खूप स्पर्धा, एकमेकींच्या शत्रू नाही तर...” अनन्या सारा आणि जान्हवीच्या मैत्रीवर जरा स्पष्टच बोलली

सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या तिघींमध्ये अनेकदा आपापसात चढाओढ दिसून येते. नुकतच अनन्या पांडेने या तिघींच्या ही मैत्रीवर भाष्य केलंय.

Chetan Bodke

Ananya Pandey May collab With Janhvi Kapoor, Sara Ali Khan Lead Role: अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा त्यांची मुलंच सर्वाधिक चर्चेत असतात. कधी त्यांच्या फॅशनमुळे तर कधी काही अन्य कारणांमुळे ते सर्वाधिक प्रकाशझोतात राहतात. अशातच काही कारणांमुळे सध्या सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या तिघीही चर्चेत आल्या आहेत. यांच्यात आपापसात नेहमीच चढाओढ दिसून येते. नुकतच अनन्या पांडेने या तिघींच्या ही मैत्रीवर भाष्य केलंय.

या तिघीही बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स म्हणून आपले नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. सारा, अनन्या आणि जान्हवी जरी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी जरी असल्या तरी ही त्या मैत्रिणी म्हणून खूप चांगल्या आहेत. त्यांच्या अभिनयाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. नुकतंच अनन्याने त्यांच्या तिघींमधील मैत्रिबद्दल भाष्य केलंय. (Bollywood Actress)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत अनन्या म्हणते, “आमच्या तिघींमध्ये ही शत्रुत्व वैगेरे काही नाही. या गोष्टीत काहीच तथ्य नाही. जेव्हा मी, सारा आणि जान्हवी आम्ही तिघीही एखाद्या महिला केंद्रीत चित्रपटात एकत्र आलो तर तो प्रेक्षकांसाठी फारच वेगळा अनुभव असेल, अशी मला खात्री आहे. तसेच या चित्रपटाच्या सेटवरील वातावरण सुद्धा छान असेल. कारण आमच्या तिघींमध्येही कामाचा एक आत्मविश्वास आहे. आम्ही तिघीही नव्या ऊर्जेने काम करतो.” असंही अनन्या म्हणाली. (Latest MarathiNews)

सोबतच त्यांच्या मैत्रीबद्दल अनन्या म्हणते, “जान्हवी आणि सारा या दोघीही मला नेहमीच मैत्रीणी म्हणून फार आवडतात. आमच्यातील नाते देखील फार चांगले आहे. प्रेक्षकांना आम्हाला एकाच फ्रेम मध्ये पाहायला आवडेल.” असं म्हणत अनन्याने स्पष्ट उत्तर दिले. (Bollywood News)

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकतीच अनन्या लायगर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लवकरच येत्या काही दिवसांमध्ये ती ‘खो गये हम कहाँ’ आणि ‘ड्रीम गर्ल २’ या सिनेमांच्या माध्यमांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘NTR 30’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस धोनी’ या दोन्ही चित्रपटांच्या कामात ची व्यग्र आहे. तर सारा अली आणि विकी कौशल ही जोडी लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT