Amruta Khanvilkar (Instagram/@amrutakhanvilkar)
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: नेमकं काय झालं? अमृता खानविलकरने थेट नवऱ्याला केलंय ब्लॉक

Amruta Khanvilkar Block and Unfollow Her Husband : हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकरकडे एक क्युट कपल म्हणून पाहिले जाते.

Pooja Dange

अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या डान्स आणि अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकते. वाजले की बारा, चंद्रा या गाण्यांवर प्रेक्षक कधीही ताल धरू शकतात इतकी प्रेक्षकांना आवडतात. अमृताच्या डान्स आणि अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडियाची सुद्धा तितकीच चर्चा असते.

सोशल मीडियावर अमृता सक्रिय आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. मात्र अमृता खानविलकरने तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे. अमृताने हिमांशूला चक्क सोशल मीडियावरून ब्लॉक केलं आहे.

हिमांशू मल्होत्रा, अमृता खानविलकरचा नवरा आहे. या दोघांकडे एक क्युट कपल म्हणून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि तिच्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. मात्र आता अमृताने हिमांशुला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अमृताने तिच्या आणि हिमांशूच्या नात्याविषयी खुलासा केला आहे प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॅाक शोमध्ये अमृता याविषयी बोलली आहे. बरं, अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने अमृताला अनफॉलो केले आहे, त्यांच्यात नेमकं काय घडलं, ते दोघे एकमेकांना ब्लॉक आणि अनफॉलो का करतात, याचे उत्तर प्रेक्षकांना शुक्रवारी म्हणजेच १० फेब्रुवारी मिळणार आहे.

'माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नाही' अशी खंतही यावेळी अमृताने व्यक्त केली. 'पटलं तर घ्या विथ जयंती'मध्ये अमृताने अनेक गोष्टी, गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला असून अमृता आणि ओम ‘बर्गर बडीज’ असल्याचे गुपित त्याने यावेळी सांगितले.

'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच ललिता शिवाजी बाबरवर आधारित मराठी चित्रपट घेऊन अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच ती एक बायोपिकमध्ये काम करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT