Vicky Kaushal and Katrina Kaif  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 7: कतरिना कैफसोबत झालं होतं भांडण, स्वतः विकी कौशलनंच केला मोठा खुलासा

अभिनेता विकी कौशलच्या वैवाहिक आयुष्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे विकीने त्याच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित अनेक रंजक खुलासे केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Koffee With Karan 7 |मुंबई : बॅालिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळं चर्चेत असतो. या लोकप्रिय चॅट शोमध्ये सेलिब्रिटींच्या 'पर्सनल टू प्रोफेशनल' लाईफबाबत अनेक खुलासे होत असतात. यावेळी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(sidharth malhotra) आणि अभिनेता विकी कौशल(vicky kaushal) 'कॉफी विथ करण ७'मध्ये सहभागी झाले आहेत. अभिनेता विकी कौशलच्या वैवाहिक आयुष्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे विकीने त्याच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित अनेक रंजक खुलासे केले आहेत. याचबरोबर एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने कतरिनासोबतच्या भांडणाचाही उल्लेख केला होता.

त्याच झालं असं की, करणने विकीला विचारले, 'एक अशी गोष्ट सांग ज्यामुळे तुझ्यात आणि कतरिनामध्ये भांडण झालं असेल'. यावर विकीने आस्थेवाईकपणे उत्तर दिले आणि म्हणाला, 'क्‍लोजेट स्‍पेस.' विकीने याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, "कतरिनाने संपूर्ण खोलीचा ताबा घेतला आहे. मला फक्त एक कपाट दिले आहे, आता लवकरच ते पण जाऊन एक ड्रॉवर राहील माझ्यासाठी." करणनेही विकीच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. करणने पुढे असेही सांगितले की, करण विकीच्या घरी गेला होता आणि त्याने पाहिले की विकीच्या कपड्यांसाठी कपाटात जागा नाही.

करणने विकीला कतरिनाच्या सर्वात वाईट सिनेमाबद्दलही विचारले. विकीने त्याला उत्तर देत 'फितूर'या सिनेमाचे नाव घेतले. रॅपिड फायर राउंड दरम्यान, विकीने हे देखील उघड केले की, कतरिना त्याच्यापेक्षा उत्तम जेवण बनवते. विकी कौशल आणि कतरिनाचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. आपल्या वैवाहिक जीवनाविषयी विकी म्हणाला की, कतरिनासोबत लग्न करून मी खूप खूश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT