Marathi Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Web Series: चित्तथरारक माईंड गेम…; सुबोध भावेची 'कालसुत्र'मधून OTT वर एन्ट्री, पाहा Trailer

पहिल्यादांच अभिनेता सुबोध भावे वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. याविषयीची माहिती स्वत: सुबोध भावेने सोशल मीडियावर दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'बस बाई बस' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुबोध भावे(Subodh Bhave) आता ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. लवकरच एका वेगळ्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटक, मालिका, चित्रपटात दमदार अभिनय केल्यानंतर पहिल्यादांच अभिनेता सुबोध भावे वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. याविषयीची माहिती स्वत: सुबोध भावेने सोशल मीडियावर दिली आहे.

सुबोध भावेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आगामी वेबसीरीजचा ट्रेलर शेअर केला आहे. 'कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता'(kalsutra) असे त्याच्या वेबसीरीजचे नाव आहे. जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे मराठीतला पहिला थरारक आणि रोमांचकारी अॅक्शन थ्रीलर वेब शो... सुबोध भावे आणि सयाजी शिंदे यांच्या जुगलबंदीची थरारक कथा... ! एक चित्तथरारक माईंड गेम... 'कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता' असे भन्नाट कॅप्शन त्याने लिहिले आहे.

'कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता' या वेबसीरीजमध्ये सुबोध भावे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रहस्यमय कथा असलेल्या या मराठी वेबसीरीजमध्ये सुबोध भावेसह सयाजी शिंदे, स्वप्नील जोशी, चिन्मय मांडलेकर हे कलाकार झळकणार आहेत. भीमराव मुडे दिग्दर्शित, सुबोध भावे निर्मित या वेबसिरीजची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. 'कालसूत्र- प्रथम द्वार मृत्यूदाता' ही वेबसीरीज २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT