Subodh Bhave On Har Har Mahadev  Instagram/@subodhbhave
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev: हा माझा शेवटचा बायोपिक असेल...; चित्रपटाबाबत सुबोध भावेचा मोठा निर्णय

अभिनेता सुबोध भावेने बॉयोपिकबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Pooja Dange

Subodh Bhave Har Har Mahadev Movie: मनोरंजन सृष्टीत सध्या तणावाचे वातावरण आहे. बहुतेक चित्रपट आणि कलाकार यांना कोणत्या न कोणत्या कारणाने वादाला सामोरे जावे लागत आहे. हर हर महादेव चित्रपटावरून देखील महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता. आता या चित्रपटावर अभिनेता सुबोध भावेने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सुबोध भावे यांनी यापुढे बायोपिकमध्ये काम करणार नसल्याचे म्हटले आहे.

१८ डिसेंबर, २०२२ म्हणजे आजच्या दिवशी झी मराठी वाहिनीवर हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट वाहिनीवर प्रदर्शित केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला होता.

अभिनेता सुबोध भावे सध्या कोल्हापुरात शूटिंग करत आहेत. कोल्हापुरातील शिवभक्तांनी आक्षेपार्ह सीन वगळता चित्रपट दाखवला नाही तर पुढचे काही दिवस सुबोध भावे कोल्हापुरात शूटिंग करत आहेत, असा इशारा दिला आहे. (Subodh Bhave)

'मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करेन, परंतु इथून पुढे कोणताही बायोपिक करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक सिनेमा असेल, असे सुबोध भावे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावेची भेट घेऊन त्यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह सीन वगळण्यास शिवभक्तांच्या भावना दिग्दर्शक आणि निर्मात्यांपर्यंत पोहचविण्याची विनंती केली. (Movie)

संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यांनी या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाला देखील विरोध केला होता. या चित्रपटामधील कलाकार भूमिकेला साजेसे नाही असे त्यांनी म्हटले. ऐतिहासिक चित्रपटावरून होणाऱ्या वादामुळे अभिनेता सुबोध भावे याने बॉयोपिकमध्ये काम न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT