अरारा... खतरनाक! 'या' दहीहांडीत १०० टक्के नाचायला येणार प्रविण तरडे
अरारा... खतरनाक! 'या' दहीहांडीत १०० टक्के नाचायला येणार प्रविण तरडे Saam Tv News
मनोरंजन बातम्या

अरारा... खतरनाक! 'या' दहीहांडीत १०० टक्के नाचायला येणार प्रविण तरडे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनसे नेते अभिजीत पानसे (MNS leader abhijeet panse) यांनी यंदा दहीहांडी उत्सव (dahihandi festival) साजरी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 'विश्वविक्रमी दहीहंडी ३१ ॲागस्टला होणार!' अशी फेसबुक पोस्ट त्यांनी २१ जुलैला केली होती. यावर प्रतिक्रिया देत मराठी अभिनेते प्रविण तरडे (marathi actor pravin tarde) यांनी या दहीहंडीत '१०० टक्के नाचायला येणार' अशी प्रतिक्रिया दिली आहे. actor pravin tarde will dance in MNS's dahihandi festival

कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात कोणतेही सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या करता येत नाही. सर्वच सण, उत्सव, राजकीय सभा आणि गर्दी होईल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. त्यामुळे अनेक सण - उत्सव साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात साजरे होत आहे. मात्र असं असुनही राजकीय नेत्यांचे पक्ष मेळावे, उद्घाटन समारंभ, लग्न समारंभ यांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळेच हे नियम नक्की कुणासाठी आहेत, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.

हे देखील पहा -

याच अनुषंगाने मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी चालू करण्याबाबत राज ठाकरेंनी (MNS cheif raj thackeray) कालच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी निर्बंधांमध्ये शिथिलता दिली पाहिजे असे मनसेने अनेकदा सांगितले आहे. त्यानुसारच आता कोरोनासोबत राहुन, कोरोना नियमांचे पालन करत दहिहांडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. यात प्रविण तरडेही सहभागी होणार आहे. मात्र मनसेच्या या दहीहांडीला परवानगी मिळते का, हे पहावं लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

SCROLL FOR NEXT