Prabhas Look Viral 
मनोरंजन बातम्या

Kannapa: प्रभासचा लूक व्हायरल करणाऱ्याचा शोध घ्या; 'कन्नपा' चित्रपट निर्माते देणार लाखो रुपयांचे बक्षीस,काय आहे कारण?

Prabhas Look Viral: 'कन्नप्पा'मधील प्रभासचा लूक लीक झाल्यानंतर निर्मात्यांची चिंता वाढलीय. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक निवेदन जारी करून चाहत्यांना खास आवाहन केले आहे. गुन्हेगाराला पकडण्यात मदत करणाऱ्याला बक्षीस देऊ असं निर्मात्यांनी जाहीर केले आहे.

Bharat Jadhav

अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी 'कन्नप्पा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मुकेश कुमार सिंग यांच्या या चित्रपटात प्रभासने कॅमिओ केलाय. पण नुकताच या चित्रपटातील प्रभासचा लूक सोशल मीडियावर लीक झाला आणि त्यानंतर सर्वत्र खळबळ उडालीय. निर्मात्यांनी अद्याप प्रभासच्या व्यक्तिरेखेबद्दल काहीही खुलासा केलेला नाही.

पण फोटो लीक झाल्यामुळे आता 'कन्नप्पा'मध्ये प्रभास कोणत्या भूमिकेत दिसणार हे सर्वांनाच माहीत झालंय. याचमुळे निर्माते संतपाले आहेत. फोटो लीक करणाऱ्याला शोधून देणाऱ्याला थेट त्यांनी बक्षीस जाहीर केलंय.

चित्रपटातील प्रभासचा लूक व्हायरल झाल्यामुळे निर्माते नाराज झाले आहेत. निर्मात्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना विनंती केली की, कृपया करून कोणीही हा फोटो शेअर करून नये. दरम्यान आता निर्माते आक्रमक झाले असून त्यांनी कठोर शब्दात नाराजी व्यक्त केलीय. जो कोणी फोटो शेअर करणाऱ्याला शोधून देईल त्याला लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा चित्रपट निर्मात्यांनी केलीय. दरम्यान फोटो कोणी शेअर करू नये म्हणून 'कन्नप्पा टीमकडून मनापासून आवाहन करण्यात आलंय.

प्रिय प्रभासच्या चाहत्यांनो आणि समर्थकांनो, गेल्या 8 वर्षांपासून आम्ही कन्नप्पामध्ये आमचे मन आणि आत्मा ओतला आहे. २ वर्षांच्या उत्कट निर्मितीनंतर आमची टीम तुमच्यासाठी उत्तम दर्जाचे आणि उत्तम चित्रपट आणण्यासाठी समर्पित आहे. परंतु हे अत्यंत खेदजनक आहे की चित्रपटातील एक फोटो परवानगीशिवाय चोरली गेलीय.

हे उल्लंघन केवळ आमच्या मेहनतीलाच कमी करत नाही तर 2,000 हून अधिक VFX कलाकारांसह या प्रकल्पावर काम करणाऱ्या हजारो लोकांच्या मेहनतीवरही परिणाम करणार आहे. आम्ही फोटो लीक करणाऱ्याला शोधण्यासाठी वचनबद्ध आहोत. फोटो लीक करण्यासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा देखील विचार केला जात असल्याचं निर्मात्यांनी एक निवेदनात म्हटलंय.

‘आम्ही आमच्या निष्ठावंत चाहत्यांकडून समर्थनासाठी आवाहन करत आहोत. आम्ही विनंती करतो की ही लीक झालेली फोटो/फुटेज शेअर करू नका कारण तसे केल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. हो फोटो लीक करण्याविषयी कोणी आम्हाला माहिती देईल, त्याला आम्ही त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस देऊ. फोटो लीक होण्याविषयी कुठलीय कोणतीही लीड मिळाली तर कृपया अधिकृत 24 फ्रेम्स फॅक्टरी ट्विटर खात्यावर माहिती पाठवा. हा चित्रपट प्रेम आणि समर्पणाने बनलेला आहे आणि तुम्ही आम्हाला मदत करा, अशी आम्ही विनंती करतो, असं निर्माते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026: चारधाम यात्रेला जाताय? 'हे' सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही दर्शन, काय आहे नियम?

Maharashtra News Live Update: घायल हूँ, इसलिए घातक हूँ"..! ईडीच्या फेऱ्यातून कोर्टाने सुटका झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Post Office Scheme : ₹१००० गुंतवा अन् महिन्याला मिळवा २०, हजार व्याज; पोस्टाच्या या योजनेत व्हाल मालामाल

भाजपच्या मोर्चावर ताईंनी बाटली फेकून मारली; 'त्या' घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

Actor House Burgled: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी चोरी; मोलकरणीने लंपास केले लाखोंचे दागिने आणि रोकड

SCROLL FOR NEXT