Manoj Bajpayee Mother Passes Away At The Age Of 80 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee: अभिनेता मनोज वाजपेयीवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांनंतर आता आईची सावलीही हरपली

मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे निधन झाले आहे.

Pooja Dange

Manoj Bajpayee News: बॉलिवूडमधील दर्जेदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. मनोज वायपेयीची आई गीता देवी त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. अखेर वयाच्या ८० व्या वर्षी गुरुवारी सकाळी 8.30 वाजता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या एका आठवड्यापासून गीता देवी यांच्यावर दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मनोज यांनी त्यांची सर्व कामे बाजूला ठेवून रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली होती.

वडिलांचे निधन झाल्यानंतर एका वर्षांनी मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या आईला सुद्धा गमावले आहे. मनोज वाजपेयी यांचे वडील राधाकांत वाजपेयी यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्लीत निधन झाले होते. मनोज वाजपेयी त्यांच्या आई आणि वडिलांच्या खूप जवळ होते. अनेकदा मुलाखतीदरम्यान मनोज आईचा एक शिकवण सांगत असतात की, ज्याला यश मिळत नाही त्याला कधीही मूर्ख समजू नका. आई-वडिला दोघांचेही छत्र गमावल्यानंतर छत्र अभिनेता असह्य झाला आहे.

मनोजचा वाजपेयीचा जन्म बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेलवा येथे झाला होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यासाठी मनोज दिल्लीला गेले. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनोज मुंबईला आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT