Laxmikant Berde and Bharat Jadhav Saam TV
मनोरंजन बातम्या

Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एका फोन अन् भरत जाधव यांनी घेतला चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय

अभिनेता भारत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह 'पछाडलेला' चित्रपटामध्ये काम केले.

Pooja Dange

Laxmikant Berde Death Anniversary: मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध स्टार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांचे चित्रपट, नाटक, मालिका सर्वच आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यांची जागा आजही कोणी घेऊ शकत नाही. लक्ष्या म्हणून जेवढे त्यांनी हसवलं तेव्हाच विदूषक बनवून डोळ्यातून पाणी आणलं.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ साली रत्नागिरी येथे झाला होता. नाटकांपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास खूप रंजक होता. आजही त्यांचे सहकलाकार त्यांचे किस्से सांगत असतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाऊन आज १८ वर्ष झाली आहेत. तरीही त्यांच्या आठवणी सर्वांच्या मनात ताज्या आहेत.

अभिनेता भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह 'पछाडलेला' चित्रपटामध्ये काम केले. दोघांच्याही या चित्रपटातील भूमिका विलक्षण विनोदी होता. तसेच त्या प्रेक्षकांना भावल्या देखील. पण लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. (Actor)

भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सांगण्यावरून 'पछाडलेला' चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. महेश कोठारे यांनी २००३ मध्ये जेव्हा भरत जाधव यांना 'पछाडलेला' चित्रपटामध्ये काम करण्याविषयी विचारले होते. महेश यांना लगेच चित्रपटाचे काम सुरू करायचे होते. तेव्हा भरत जाधव यांना 'सही रे सही'चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते. त्यामुळे त्यांनी महेश कोठारे यांना नकार दिला होता. (Movie)

काही महिने गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये लक्ष्मीकांत यांनी भरत यांना कॉल केला आणि म्हटलं, 'तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वेगैरे. महेशला जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो पिक्चर सोडू नकोस.'

यानंतर भरत जाधव यांनी महेश याची भेट घेतली आणि लक्ष्मीकांत यांना कळवले की ते पछाडलेला चित्रपट करत आहेत. भरत यांचे म्हणणे होते की, लक्ष्मीकांत कोणालाही चित्रपटामध्ये घेऊ शकले असते. पण त्यांनी ती संधी भरत जाधव यांना दिली. 'पछाडलेला' या चित्रपटाला भरत जाधव लक्ष्मीकांत यांचा आशीर्वाद मानतात.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे हे मराठी मनोरंजन सृष्टीतील योगदान खूप मोलाचे होते. त्यांची आठवण आजही प्रेक्षकांच्या तसेच कलाकारांच्या मनात अजूनही जिवंत आहे. भरत जाधव यांनी शेअर केलेली आठवण त्यांच्याविषयी बरंच काही सांगते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: युवक काँग्रेस आणि संजय गायकवाड यांचे समर्थक आमनेसामने

New Rules 2026: १ मे २०२६ पासून ७ नियम बदलणार, बॅंकेपासून ते गॅस सिलेंडरवर होणार परिणाम

Crime news: रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला; फ्लॅटचे दार तोडून पोलीस आत घुसताच उडाली खळबळ

High Blood Pressure: तुमचा BP वाढलाय का? या ७ लक्षणांवरुन ओळखणं होईल सोपं

Digital Account: तुमची किती बँक खाती आहेत? एकच खाते असेल तर आताच वाचा ही बातमी

SCROLL FOR NEXT