Hou De Dhingana 2 Promo  Instagram
मनोरंजन बातम्या

Hou De Dhingana 2 Promo: सिद्धु पुन्हा साडे माडे शिंतोडे उडवणार, ‘होऊ दे धिंगाणा’च्या आगामी सीझनचा प्रोमो प्रदर्शित

Hou De Dhingana 2 News: ‘होऊ दे धिंगाणा’ या शोचा येत्या काही दिवसांत दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Hou De Dhingana 2 Promo Shared On Social Media

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव कायमच आपल्या खास शैलीतील कॉमेडी साठी चर्चेत असतो. एक उत्कृष्ट अभिनेता आणि एक दमदार विनोदी कलाकार म्हणून त्याने प्रेक्षकांमध्ये आपली छाप पाडली आहे. सिद्धार्थ जाधव हा एक उत्कृष्ट होस्ट अर्थात सुत्रसंचालक सुद्धा आहे, गेल्या वर्षी स्टार प्रवाहावर टेलिकास्ट झालेल्या ‘होऊ दे धिंगाणा’ या शोच्या माध्यमातून त्याने होस्टिंगला सुरुवात केलेली.

पुन्हा एकदा अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला एक होस्ट म्हणून येणार आहे. ‘होऊ दे धिंगाणा’ या शोचा येत्या काही दिवसांत दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी सीझन येणार असल्यामुळे प्रेक्षकांना या शोची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

पहिला सीझन सुपर डुपर हिट ठरल्यानंतर या शोचा आगामी सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी पर्वात प्रेक्षकांना साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्याही पाहायला मिळणार आहेत. यावेळी आगामी पर्वामध्ये, स्टार प्रवाहाच्या परिवारात नव्याने सामील झालेले सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. गेल्या सीझनप्रमाणेच या सीझनमध्येही प्रेक्षकांना तीच धम्माल मस्ती पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मालिकेच्या सेटवरील गंमती- जंमती आपल्याला नव्याने पुन्हा एकदा ऐकायला मिळणार हे नक्की. (Serial)

नुकताच स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम अधिकृत हँडलवर ‘होऊ दे धिंगाणा’च्या आगामी सीझनचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला सर्वांचा लाडका सिद्धु पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत दिसतोय, शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तो म्हणतो, “हा.... बहुत नवेनवे कलाकार आलेय स्टार प्रवाहावर” असं म्हणत पुढे तो अनेक मालिकेतील कलाकारांचे नाव घेतो.

सिद्धुचा या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवा लूक दिसणार आहे. पुन्हा त्याची कॉमेडी आणि प्रेक्षकांना लोटपोट हसवणारे विनोद आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीआरपीमध्ये अव्वल ठरलेली ही मालिका पुन्हा एकदा सुपर डुपर हिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

कार्यक्रमाला फक्त देशभरातूनच नाही तर, जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या सिद्धुची प्रेक्षकांना जबरदस्त एनर्जी, मालिकेतला धिंगाणा पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. स्टार प्रवाहचा हा हटके आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा २’ येत्या २१ ऑक्टोबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात केले हजर

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT