Amol Kolhe Injured Saam TV
मनोरंजन बातम्या

Amol Kolhe Injured: अभिनेते अमोल कोल्हेंना 'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान गंभीर दुखापत, कराडमधील पुढचे प्रयोग रद्द

Amol Kolhe Injured: अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ जारी करत याबाबत माहिती दिली.

रोहिदास गाडगे

Amol Kolhe Injured: राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना पाठिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. 'शिवपुत्र संभाजी' या नाट्यादरम्यान अमोल कोल्हे यांना ही दुखापत झाली आहे. अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ जारी करत याबाबत माहिती दिली.

शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे शेवटचे दोन प्रयोग छत्रपती कराडमध्ये पार पडत आहेत. यावेळी नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरत असताना घोडेस्वारी करताना घोड्याच्या पाय घसल्याने कोल्हे यांच्या पाठीच्या मनक्याला त्रास झाला. (Latest Marathi News)

मात्र त्रास होत असताना देखील त्यांनी महानाट्य सुरु ठेवले. पेन किलर गोळी घेऊन महानाट्य प्रयोग त्यांनी पूर्ण केला. दरम्यान गंभीर दुखापत असताना कराड येथील संध्याकाळी प्रयोग होणार असल्याचे कोल्हेंनी जाहिर केला.

कराड येथील प्रयोग संपल्यानंतर तातडीचे पाठीच्या गंभीर दुखापतीवर उपचारासाठी अमोल कोल्हे यांनी पुण्यात दाखल व्हावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड (11 मे ते 16 मे) येथील प्रयोग ठरल्यावेळेप्रमाणे होणार असल्याचे कोल्हेंनी जाहीर केलं आहे. त्यासाठी वेळेत उपचार घ्यावे लागणार आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

मात्र कराडमधील काही प्रयोग रद्द करावे लागणार आहे. ज्या प्रेक्षकांना पुढील प्रयोगाचे अॅडव्हान्स तिकीट काढले आहेत त्यांना आधी होणारा प्रयोग (1 मे रोजी होणारा प्रयोग) पाहता येणार आहे. तर ज्यांना आजचा प्रयोग पाहता येणार त्यांना त्यांचे तिकिटाचे पैसे परत केले जातील असंही अमोल कोल्हे यांनी जाहीर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT