Aamir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan: वयाच्या ५९ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार का?स्वत:च केला खुलासा

Aamir Khan On Marriage Again: बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान नेहमीच त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. चित्रपटाच्या माध्यमातून आमिरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आमिरला वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप प्रश्न विचारले जातात. आमिर ही त्या प्रश्रांची सहजपणे उत्तरं देतो. आतादेखील आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे.

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, आमिर खानची दोन लग्न झाली आहेत. त्यांचे पहिले लग्न १८ एप्रिल १९८६ मध्ये रीना दत्तासोबत झाले. रीना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहेत. मात्र लग्नांच्या १६ वर्षानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला.

यानंतर आमिर खान अभिनेत्री किरण रावशी दुसऱ्यांदा लग्न विवाहात अडकला. किरण आणि आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे. परंतू याचं प्रेम फार काळ टिकलं नाही. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोनदा घटस्फोट झाल्यानंतर आता पुन्हा अमिर खान लग्नबंधनात अडकणार का अशी सध्या चर्चा आहे.

रिया आणि आमिरची मुलाखत

नुकताच झालेल्या रिया चक्रवतीच्या पॉडकास्टवरच्या मुलाखतीत, आमिर खानला पुन्हा लग्न करणार का असं विचारण्यात आले. यावर अमिरने, 'आता मी ५९ वर्षाचा आहे.... मला नाही वाटत की मी तिसरं लग्न करेल. हे सध्या अवघड आहे. सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत. मी माझ्या कुटुबियांशी जवळ आलो आहे. तर मी त्यांच्यासोबत फार आनंदी आहे. सध्या एक मी चागंला व्यक्ती होण्याचा प्रयन करत आहे.' असे आमिरने सांगितले.

आमिरने या मुलाखतीत त्याच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. आमिर च्या कामावद्दल सांगायचं झालं तर, २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर 'च्या सिनेमाच्या सिक्कलमध्ये अभिनेता सध्या व्यस्त होता. सिनेमात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लाल सिंग चड्डा 'या चित्रपटात आमिर शेवटचा दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT