Pathaan World Wide Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan World Wide Collection: बॉयकॉट ट्रेंडमध्येही शाहरुखच्या 'पठान'ने बॉलिवूडला तारले, दोन दिवसात जगभरात कमावले कोट्यवधी

'पठान' चित्रपटाचा डंका भारतातच नाही तर जगभर वाजत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathaan Box Office Collection: शाहरुख खानच्या 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तर चित्रपटगृहाच्या मालकांचा खिसा भरला आहे. 'पठान' चित्रपटाचा डंका भारतातच नाही तर जगभर वाजत आहे. फिल्म ट्रेड एक्स्पर्ट रमेश बाला यांनी ट्विट करत 'पठान'ने जगभरात २३५ करोड रुपयांची कमाई केली असल्याचे सांगितले आहे.

शाहरुख खानच्या 'पठान'बद्दल रमेश बालाने माहिती दिली की, या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 235 कोटींची कमाई केली आहे. हे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे. तर 'पठान'ने पहिल्याच दिवशी भारतात जवळपास 70 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आणि बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडत आहे.

'पठान'ने दोन दिवसात 'केजीएफ २' चित्रपटाला मागे टाकले. यश स्टारर 'केजीएफ २' चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन ३०० करोड होते. हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित झाला होता.

'पठान' चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे चित्रपट आपला खर्च वसूल करण्याच्या अगदी जवळ आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT