Abdu and MC Stan  Instagram
मनोरंजन बातम्या

Abdu-MC Stan: अब्दु-स्टॅनच्या मैत्रीत दुरावा; लाईव्ह करत छोट्या भाईजानने व्यक्त केले संताप

Abdu-MC Stan Friendship: एमसी स्टॅनशी झालेल्या भांडणाचा खुलासा करून अब्दुने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Saam Tv

Abdu-MC Stan Bigg Boss 16: हिंदी 'बिग बॉस'ने यावेळी धुमाकूळ घातला होता. शोला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे १०० दिवसांचा शो १२० दिवसांचा करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे या 'बिग बॉस'मध्ये देखील दोन टीम होत्या. त्यातील 'मंडली'ने प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधले. या मंडलीमध्ये अब्दु रोजिक, साजिद खान, शिव ठाकरे, एमसी स्टेन, निम्रित कौर अहलुवालिया आणि सुंबूल तौकीर खान यांचा समावेश आहे.

'बिग बॉस'मध्ये त्यांच्यात घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती, मात्र शो संपल्यानंतर त्यांच्या भांडणे होत असल्याचे देखील समोर येत आहे. अलीकडे, अब्दू रोजिकने देखील यावर शिक्कामोर्तब केली आहे. तसेच त्याचे आणि एमसी स्टॅनचे बिनसले असल्याचे सांगितले आहे.

'बिग बॉस'मध्ये एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांची खूप घट्ट मैत्री होती. शो संपल्यानंतर ही मंडली संपली असल्याचे अब्दूने आधी सांगितले होते. आता एमसी स्टॅनशी झालेल्या भांडणाचा खुलासा करून अब्दुने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

अब्दूने एका लाईव्ह दरम्यान सांगितले की एमसी स्टॅन त्याचा फोन डिस्कनेक्ट करत आहे. अब्दू म्हणाले की, स्टॅन मीडियामध्ये सांगत आहे की, 'त्याच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी मी त्याला कॉल करत आहे.'

अब्दू रोजिकने चाहत्यांशी संवाद साधत त्याचा राग व्यक्त केला आहे. अब्दू लाईव्हमध्ये म्हणाला, “जेव्हा मी एमसी स्टॅनला कॉल केला तेव्हा तो मला हाय किंवा सलाम म्हणत नाही, तर थेट माझा कॉल डिस्कनेक्ट करतो. सगळेजण मला एमसी स्टॅनबद्दल विचारत आहे.

मी एमसी स्टॅनबद्दल वाईट बोलू शकतो असे तुम्हाला खरोखर वाटते का? बिग बॉसमध्ये जेव्हा तो दु:खी असायचा, तेव्हा मी त्याच्यासोबत होतो. आता स्टॅन मीडियामध्ये सांगत आहे की मी त्याला माझ्या गाण्याचे प्रमोशन करायला सांगत आहे. तो असे का करत आहे. माझे डोके दुखत आहे. ही बातमी ऐकल्यापासून मला राग येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT