Aamir Khan Upcoming Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

आमिर खानने चित्रपटाच्या अपयशनंतर अॅक्टिंग न करण्याचा घेतला निर्णय, करणार नवी सुरुवात

आमिर खान त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनयातून पहिल्यांदाच ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aamir Khan Upcoming Movie: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आता त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयी चर्चा होत आहे. आमिर खानच्या आगामी 'चॅम्पियन्स' या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. चाहतेही यासंदर्भातील अधिकृत बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर यासंबंधीची माहिती समोर आली आहे. आमिर खानने अलीकडेच दिल्लीत त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमात 'चॅम्पियन्स'बद्दल काही खुलासे केले. आमिर खान त्याच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत गेला होता. जिथे त्याने 'चॅम्पियन्स' बद्दल एक खास अपडेट शेअर केली आहे.

आमिर खानने सांगितले आहे की, 'ही एक अप्रतिम स्क्रिप्ट आहे. ही एक सुंदर कथा आहे आणि हा एक हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे, परंतु मला वाटते की मी थोडा ब्रेक घ्यावा. मला माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत राहायचे आहे.' आमिरला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. म्हणूनच त्याने चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. (Aamir Khan)

आमिरच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनयातून ब्रेक घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्याने उघड केले आहे. तो पुढे म्हणाला, "मला वाटते की मी 35 वर्षांपासून काम करत आहे आणि मी माझ्या कामावर एकट्याने लक्ष केंद्रित केले आहे. मला असे वाटते की माझ्या जवळच्या लोकांसाठी हे योग्य नाही. हिच वेळ आहे की, मला वाटते की मी काही काम करू नये आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा आणि जीवनाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्यावा. मी पुढचे वर्ष-दीड वर्ष मी अभिनेता म्हणून काम करणार नाही." (Actor)

आमिर खान पुढे म्हणाला, 'मी 'चॅम्पियन्स'ची निर्मिती करणार आहे कारण मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. मला वाटते ही एक चांगली कथा आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स, इंडिया आणि 200 नॉटआउट प्रॉडक्शन्स या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहेत. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्याकडून PM मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष; ५०० वाहनांचा ताफा काढून केलं शक्तिप्रदर्शन, VIDEO

SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

रात्री झोपताना ब्रा काढून का झोपावे? त्रास होण्यापूर्वी ही धक्कादायक माहिती वाचा

Canine Distemper Virus: वाघांना कॅनाइन डिस्टम्पर व्हायरसचा धोका, महाराष्ट्रात अलर्ट

Maharashtra Heatwave: सूर्य आग ओकणार... महाराष्ट्रात पुढील ३ दिवस उष्णतेची तीव्र लाट; कोणत्या जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT