Aamir Khan On PM Modi Twitter
मनोरंजन बातम्या

Aamir Khan On PM Modi: मोदींच्या ‘मन की बात’ मध्ये अमिर खानची एन्ट्री; पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाला...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अमिर खान देखील सहभागी होणार आहे.

Chetan Bodke

Aamir Khan Part Of 'Mann Ki Baat' 100th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातल्या नागरिकांसोबत संवाद साधतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांसोबत अनेक महत्त्वाच्या योजना किंवा इतरत्र गोष्टी पोहोचवत असतात. नुकतेच या रेडिओ कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होणार आहेत. राजधानी दिल्लीत ‘मन की बात @ 100’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘मन की बात’चा १०० वा भाग ३० एप्रिल रोजी प्रसारित केला जाणार आहे, ज्यामध्ये १०० लोक सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या १०० लोकांचा उल्लेख केला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री रवीना टंडन हे दोघेही एकत्र सहभागी झाले होते. आमिर खानने पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला ऐतिहासिक उपक्रम असल्याचे वर्णन करत त्यांचे आणि कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि रवीना टंडन यांच्यासोबत अनेक अभिनेते आणि खेळाडू, पत्रकार, रेडिओ जॉकी आणि व्यावसायिक बुधवारी एकदिवसीय परिषदेत सहभागी होतील. आमिरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, ‘मन की बात’ त्याचे मत सांगितलं आहे.

आमिर खान मुलाखतीत म्हणतो, ‘देशातील उच्चस्तरीय आणि महत्वाचा नेता तुमच्यासोबत संवाद साधणार आहे, हिच बाब आपल्यासाठी महत्वाची आहे. देशाला पुढे नेणारे विचार, महत्त्वाचे विचार पंतप्रधान तुमच्यासमोर ठेवत आहेत, हिच बाब आपल्यासाठी महत्वाची आहे. सर्वसामान्यांचा सल्ला घेत आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात चर्चा झालेल्या या सर्व गोष्टींबद्दल तुमचा नेता तुमच्याशी बोलत आहे हे खूप महत्त्वाचं संभाषण आहे. ‘मन की बात’चा भारतातील अनेक लोकांवर खोल परिणाम झाला आहे.’ (Bollywood Actor)

नवी दिल्ली येथे एक दिवसीय परिषद झाली, ज्याचे उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आमिर खान, रवीना टंडन सोबत पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी, दीपा मलिक, संगीतकार रिकी केज यांसारख्या दिग्गज व्यक्तीही सामिल होतील. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT