Aamir khan Saam tv
मनोरंजन बातम्या

Aamir khan: 'मला मराठी भाषा येत नाही, याची...'; आमिर खान असं का म्हणाला? पाहा व्हिडिओ

Aamir khan: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने खास मुलाखतीत त्याने मराठी भाषेबाबतचे अनुभव शेअर केला आहे.

Shruti Vilas Kadam

Aamir khan: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत आहेत. या हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे देखील एकत्र आले आहेत. अशाच वेळी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो मला मराठी येत नाही याची लाज वाटते असे बोलला आहे.

आमिर खानला विचारले की तुला मराठी भाषा बोलता येते का? त्याला उत्तर देताना आमिर म्हणाला, "माझ्या वडिलांचे शिक्षण पुण्यात झाले. माझे आजोबा नाशिकचे होते. त्यामुळे आमच्या घराचं महाराष्ट्राशी खूप जुने नातं आहे. पण असं असूनही मला मराठी बोलता येत नाही याची मला लाज वाटते.

त्याने पुढे सांगितले की, "माझं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं त्यामुळे मला इंग्रजी भाषा येते, हिंदी भाषा येते. मला उर्दू माझी भाषा असल्यामुळे ती बोलता येते लिहता येत नाही आणि मला मराठी भाषा समजते पण बोलता येत नाही त्यामुळे जेव्हा मी ४४ वर्षांचा होतो, तेव्हा स्वतःला विचारलं – ‘आपण इथले असूनही इथली भाषा का येत नाही?’ त्याच वेळी आमिरने मराठी शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने सुहास लिमये यांच्याकडून तब्बल चार वर्षं मराठी शिकली. सुरुवातीला त्याच्या मुलांनीही त्याच्यासोबत मराठी शिकण्यास सुरुवात केली होती.

आमिरने स्पष्ट केलं की, "माझा मुस्लिम असण्याचा मला अभिमान आहे, पण त्याचबरोबर इथल्या संस्कृतीचा आणि भाषेचा आदर करणंही माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे." ही कबुली देताना आमिरने आपले मराठी भाषेप्रतिचे प्रेम आणि ती शिकण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांची मनापासून कबुली दिली. यामुळे तो अनेक मराठी चाहत्यांच्या अधिक जवळ गेला आहे. त्याचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेली ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT