Aamir Khan And Gauri Spratt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan: हातात हात आणि चेहऱ्यावर हसू; IFFM 2025मध्ये आमिर खान अन् गर्लफ्रेंड गौरी एकत्र, नेटकरी म्हणाले...

Aamir Khan And Gauri Spratt: किरण रावशी घटस्फोट झाल्यानंतर, आता आमिरच्या आयुष्यात एक नवीन प्रेयसी गौरी स्प्राट आली आहे. दोघेही अनेकदा कार्यक्रमांमध्ये किंवा डेटवर एकत्र दिसले आहेत.

Shruti Vilas Kadam

Aamir Khan And Gauri Spratt: बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत आहे. आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. किरण रावशी घटस्फोट घेतल्यानंतर आता त्याची नवी प्रेयसी गौरी स्प्राट आमिरच्या आयुष्यात आली आहे. दोघेही अनेकदा कार्यक्रमांमध्ये किंवा डेटवर एकत्र दिसले आहेत. दरम्यान, आता आमिर पुन्हा एकदा एका महत्वाच्या कार्यक्रमाच त्याची प्रेयसी गौरीचा हात धरून आलेला दिसला. दोघांचाही एकत्र व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आमिर गौरीचा हात धरताना दिसला

२०२५ चा मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सवाची सुरू झाली आहे. या चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आमिर खाननेही आपली उपस्थिती दाखवली. आमिरसोबत त्याची प्रेयसी गौरी स्प्राट देखील त्याच्यासोबत दिसली. या कार्यक्रमात, दोघेही लोकांची पर्वा न करता एकमेकांचे हात धरताना दिसले. गर्दीत आमिर तिची पूर्ण काळजी घेताना दिसला आहे.

लूकने चाहत्यांचे मन जिंकले

या दोघांच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, आमिरने IFFM २०२५ च्या रेड कार्पेटवर काळ्या रंगाचा गाला स्टाईल कोट घातला होता. त्याच वेळी, गौरी स्प्राट निळ्या रंगाच्या सलवार परिधान केला होता. यावेळी, पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याच्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील त्यांना एकत्र पाहून खूप आनंदी दिसत आहेत.

आमिर व्यतिरिक्त, हे कलाकार देखील आले

आमिर खान आणि गौरी स्प्राट व्यतिरिक्त, अभिनेता वीर दास, अभिनेत्री तिलोत्तमा शोम, जिम सर्भ, अदिती राव हैदरी, जयदीप अहलावत, दिग्दर्शक शुजित सरकार, अश्विनी अय्यर तिवारी, दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना, गायिका लिसा मिश्रा आणि प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा हे देखील इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM २०२५) च्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

राष्ट्रीय महामार्गांसाठी ३,००० रुपयांमध्ये वार्षिक फास्टॅग पास सुरू; पास कसा मिळवायचा पाहा VIDEO

Pranjal Khewalkar : महिलेचे चोरून फोटो, व्हिडिओ काढले; खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर आणखी गोत्यात

Onion Uttapam: नाश्त्याला झटपट बनवा उत्तप्पा; सर्वच आवडीने खातील

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT