Carry On Jatta 3 Trailer Launching Event In Kapil Sharma And Aamir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir khan On Kapil Sharma: “मी तुझा मोठा चाहता आहे पण...” म्हणत अमिरने केली कपिलची भरकार्यक्रमात तक्रार

Aamir Khan Complains To Kapil Sharma: कविता कौशिक यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये अमिरने कॉमेडियनकडे तो आपल्याला त्याच्या शोमध्ये आमंत्रित करत नाही, अशी तक्रार केली.

Chetan Bodke

Carry On Jatta 3 Trailer Launching Event In Kapil Sharma And Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट गेल्या काही महिन्यांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तो अखेरचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. अमिरचा एका पंजाबी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कविता कौशिक यांचा हा चित्रपट आहे. या कार्यक्रमाला आमिर खान तसेच कपिल शर्मासह इतर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये यावेळी अमिरने त्याच्या कार्यक्रमात कपिलकडे आमंत्रित करत नाही, अशी तक्रार केली. यानंतर कपिलनेही प्रतिक्रिया दिली आहे. चला जाणून घेऊया....

ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आमिर खान आणि कपिल शर्मा एफआयआर अभिनेत्री कविता कौशिकच्या ‘कॅरी ऑन जट्टा ३’च्या ट्रेलर लाँचिंगसाठी पोहोचले होते. कार्यक्रमात कपिल आणि आमिरमध्ये थोडक्यात चर्चा झाली. आमिर खान म्हणतो, “मी कपिलचा खूप मोठा चाहता आहे. मी नेहमीच रात्री त्याचा शो बघूनच झोपतो.” तर कपिल शर्मा म्हणतो, “आज आमिर खान ट्रेलर लाँचसाठी आल्याने मला खूप आनंद होत आहे. मला पंजाबी चित्रपट आवडत असून मी ते आवर्जुन पाहतो.”

त्यानंतर आमिर खान म्हणतो, “मला एक गोष्ट याठिकाणी आवर्जुन सांगायची आहे, तीन आठवड्यांपूर्वी मी कपिलला फोन करून सांगितलं होतं. खरं तर आजकाल मी काम कमी करतो. सध्या मी माझ्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत आहे. संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासोबत असताना काही कॉमेडी शो मी बघतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी मी काही ना काही तरी आवश्य पाहतोच. गेल्या अनेक महिन्यांपासून मी कपिलचा शो पाहतो. आणि मी त्याचा खूप मोठा चाहता झालो आहे. त्यामुळे कपिल आला तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होतो.”

आमिर खान पुढे म्हणतो, त्याच्यामुळे माझी संध्याकाळ खूप छान जाते. मी खूप हसतो, माझी खूप करमणूक होते. म्हणून दोन-तीन आठवड्यांपूर्वी मी त्याला फोन केला आणि धन्यवाद म्हटलं. तुम्ही लोकांचे खूप मनोरंजन करता त्याबद्दल धन्यवाद. लोकांचे मनोरंजन करणे हे मोठे आणि महत्वाचे काम आहे. तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला. कपिल मी तुझा मोठा चाहता आहे. आणि तू मला शोमध्ये कधीच बोलावलं नाहीस. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

त्यानंतर कपिल अमिरच्य् प्रश्नावर उत्तर देत म्हणतो, ज्या दिवशी तू येशील तो दिवस आमच्यासाठी खूप मोठा असेल, तुझं येणं आमच्यासाठी खूप भाग्यवान असेल. आपली जेव्हा केव्हा भेट झाली ती, गर्दीच्याच ठिकाणी झाली आहे. आपण नेहमीच भेटल्यावर कधी तरी ये असे म्हणालोय पण नाही भेट झाली. आपली भेट ३ वर्षांपूर्वी झाली होती. पुढे अमिर म्हणतो, मी १०० टक्के येईल. मी प्रमोशनसाठी नाही आलो तरी, मला फक्त मनोरंजन म्हणूनच यायचे आहे, पण मी नक्की येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT