Raghav Chadha and Parineeti Chopra  Saam TV
मनोरंजन बातम्या

Raghav-Parineeti Photo: परिणिती चोप्रा-राघव चढ्ढाचं जमलं? आप खासदाराच्या ट्वीटमुळे अफेयरच्या चर्चांवर शिक्कामोर्तब

AAP MP Tweet: आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे फोटो शेअर ट्विट केले आहेत.

Saam Tv

AAP MP Congratulate Raghav-Parineeti: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. दोघेही मुंबईत सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेट करताना स्पॉट झाले होते. त्यानंतर परिणीती आणि राघव लग्न करणार असल्याच्या सगळीकडे बोलले जात होते. या सगळ्यात आता खासदार संजीव अरोरा यांनीही ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले आहे.

आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिले की, “मी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या नात्यात त्यांना प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या शुभेच्छा."

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली होती. विशेष म्हणजे यावेळी राघव यांनी परिणीती दोघांनीही मॅचिंग रंगाचे कपडे घातले होते.

तेव्हापासून दोघेही डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा आप खासदार राघव चढ्ढा यांनी माध्यमांशी बोलताना अफवांवर प्रतिक्रिया देत म्हटले की, 'मला राजकारणावर प्रश्न विचारा, परिणीतीविषयी नाही.'

या वर्षी जानेवारीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशात पहिल्यांदाच या दोघांना हा सन्मान मिळाला आहे.

ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत. विशेष म्हणजे परिणीती चोप्राने यूकेच्या मँचेस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तर राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून शिक्षण घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT