Aai Kuthe Kay Karte Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीनंतर आता वीणाही अन्याच्या कानाखाली वाजवणार; अनिरुद्धचं आता सर्वच पितळ उघड पडणार

Aai Kuthe Kay Karte Upcoming Episode : अरुंधतीनंतर वीणाही अनिरुद्धच्या कानाखाली मारताना दिसणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aai Kuthe Kay Karte Latest Promo : टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा असते. मालिकेत रोजच प्रेक्षकांना नव- नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. मालिका सध्या खूप रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

मालिकेत सध्या नितीन आणि आशुतोषमध्ये तणाव असल्याचे दिसत आहे. येत्या भागात अरुंधतीनंतर वीणाही अनिरुद्धच्या कानाखाली मारताना दिसणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता वाढली आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोत एक वेगळाच ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरवातीला सर्वजण देशमुखांच्या घरी असल्याचे दिसत आहे. वीणा आणि आशुतोष घराबाहेर असतात. त्यावेळी अनिरुद्ध जोरात ओरडून म्हणतो, 'मग खुशाल कोर्टात जा. पण या धसक्याने जर माझ्या आईवडिलांना काही झाले तर सर्वस्वी तुम्ही आणि ही अरुंधती जबाबदार असेल.'

त्यावर अरुंधती (Arundhati) म्हणते, 'तुमचा अहंकार तुमच्या सदसद्विवेकबुद्धीवर स्वार झाला आहे अनिरुद्ध'. यावर अनिरुद्ध उलट अरुंधतीला म्हणतो, 'तू मला शहाणपणा शिकवू नको'. यानंतर कांचन आजी पुढे येऊन वीणाची माफी मागते. 'वीणा माझ्या मुलाला माफ कर गं. मी पदर पसरते तूझ्यासमोर.' अशी विनंती कांचन आजी वीणाला करतात.

मागील भागात नितीनच्या कपाटात वीणाचा हरवलेला फोन (Phone) सापडतो.हा फोन अनिरुद्धनेच नितीनच्या कपाटात ठेवलेला असतो. फोन सापडल्यावर अनिरुद्धने नितीन वीणाला त्रास देत असल्याचे आरोप नितीनवर लावले होते. या आरोपानंतर मात्र आशुतोषनेही नितीनवर अविश्वास दाखवला. आशुतोषने नितीनच्या कानाखालीदेखील मारली. त्यामुळे अरुंधती आणि आशुतोषमध्येही गैरसमज झाले आहेत.

या सर्व गोष्टी झाल्यावर नितीनही कंपनीतून राजीनामा देतो. एकीकडे सर्वजण नितीनवर अविश्वास दाखवत असतात तर दुसरीकडे संजना आणि यशला अनिरुद्धच्या विरोधात पुरावे सापडतात. त्यानंतर अरुंधती, संजना आणि यश अनिरुद्धनेच हे सर्व घडवून आणल्याचे सत्य सर्वांसमोर उगडकीस आणतात. यामुळे नितीनवर केलेले आरोप आता खोटे ठरले आहेत.

मालिकेच्या आजच्या भागात वीणा अनिरुद्धच्या कानाखाली मारताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नवीन भागाची आतुरता आहे. अनिरुद्धचं सत्य उघड झाल्यावर वीणा अनिरुद्धला माफ करणार का? हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर वीणाच्या भूतकाळातील गोष्टी समोर येणार का? वीणाचा नवरा मालिकेत एन्ट्री करणार का ? असे प्रश्न प्रेक्षकांमध्ये उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT