Aai Kuthe Ky Karte Serial Episode Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Video: दुसऱ्या लग्नानंतर अरुंधती भक्तीरसात झाली तल्लीन, सुरेल गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

TV Serial Update: अरुंधती व्हिडिओमध्ये 'शंभो करुणाकरा' हे गाणे गात आहे.

Pooja Dange

Arundhati Singing Video: 'आई कुठे काय करते' ही मालिका एका रंजक वळणावर आहे. अरुंधती नई आशुतोष यांचे लग्न नुकतेच पार पडले आहे. या दोघांच्या नवी प्रवासाला सुरूवात झाली आहे. तर आता या मालिकेत आणि अरुंधतीच्या जीवनात काय काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

आशुतोषशी मैत्री पलीकडे कोणत्याही नात्यात येण्यास अरुंधतीचा नकार होता. पण हळूहळू अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्याची समीकरणे बदलली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अरुंधतीच्या लग्नाला देशमुखांचा विरोध असतो. घटस्फोटानंतरही अरुंधतीने लग्न करणे अनिरुद्ध, अभिषेक आणि कांचन यांनी अमान्य असते.

अनेक विरोध आणि टीका सहन करत अरुंधतीचे अखेर लग्न होते. अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नानंतर एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओ मध्ये आशुतोष अरुंधतीच्या आधी किचनमध्ये जाऊन चहा बनावट असतो . त्यांच्या संभाषण सुरु होते आणि आशुतोष अरुंधतीला विचारतो 'तुला नाष्ट्याला काय आवडत?'

या व्हिडिओ नंतर आता अरुंधतीचा आणखी लग्नानंतरचा आणखी व्हिडिओ स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अरुंधती लग्नानंतर तिच्या गाण्याची कशी जोपासना करते, हे तुम्हाला पाहायला मिळेल. अरुंधती केळकरांच्या घरातील हॉलमध्ये येते तेव्हा तिथे वीणा ठेवलेली असते. अरुंधती वीणा पाहून खूप अनादी होते. वीणेची पूजा करून गाणे गाण्यास सुरुवात असते.

अरुंधती या व्हिडिओमध्ये 'शंभो करुणाकरा' हे गाणे गात आहे. हे गाणे ऐकून तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल. अरुंधतीचं या व्हिडिओ नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. अरुंधतीने गायलेले हे गाणे नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. प्रेक्षक हा भाग कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला

Moringa Ladoo: ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खा मोरिंगाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत; शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी? पाहा VIDEO

Maa OTT Release: थिएटरनंतर काजोलचा 'माँ' ओटीटीवर होणार प्रदर्शित; हा हॉरर चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, I Love You Too! पण कोणाला? Video

SCROLL FOR NEXT