Aai Kuthe Kay Karte, Arundhati and Ashutosh making breakfast  Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte: लग्नाच्या पहिल्याच दिवशी अरुंधती नाश्त्याला काय बनवणार? आशुतोषची खास फर्माइश

What's New In Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

Pooja Dange

Aai Kuthe Kay Karte Episode Update: 'आई कुठे काय करते' ही टीव्ही वरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत नुकताच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. अखेर अनेक अडथळे पार करून अरुंधती आणि आशुतोष याचा विवाहसोहळा पार पडला. अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नात पहिला दिवस कसा असेल हे आपल्याला येणार भागात पाहायला मिळणार आहे.

अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाला देशमुख कुटुंबातील अनिरुद्ध, अभिषेक आणि कांचन यांचा विरोध असतो. आशुतोष अरुंधतीच्या जीवनात आल्यापासूनच या तिघांचा त्याच्यावर राग होता. अरुंधतीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आशुतोषला अखेर ती मिळाली. आता दोघांच्या नवीन आयुष्याची नवी सुरूवात होत आहे आणि प्रेमाचे क्षण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अरुंधती म्हणजे मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांची ही उत्सुकता आणखी वाढवली आहे. मधुराणी तिचं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आशुतोष किचनमध्ये चहा बनवताना दिसत आहे. तर त्यावर अरुंधती त्याला देशमुखांच्या घरामध्ये काय होत हे सांगते.

अरुंधती म्हणते की, देशमुखांकडे नाश्त्याला चार पाच पदार्थ व्हायचे. कुणाला पोहे आवडायचे नाहीत तर कुणाला उपमा.. त्यावर आशुतोष म्हणतो, पण तुला काय आवडतं.. हे ऐकून अरुंधती स्तब्ध होते आणि म्हणते मला कुणी हे विचारलंच नाही. हे ऐकून आशुतोष तिला म्हणतो, 'मग आज दिवसभर तुला काय आवडत तेच आपण करायचं.'

मधुराणी शेअर केलेल्या या व्हिडिओ अनेक नेकरी कमेंट करत आहेत आणि तअरुणशेटी आणि आशुतोषला नव्या प्रवासातही शुभेच्छा देत आहेत. कोणी दोघांच्या लूकचे कौतुक करत आहे. तर कोणी मालिकेने ब्रेक केलेल्या स्टिरिओटाईपविषयी बोलत आहे. या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत आणि आशुतोषसारखा जोडीदार मिळावा अशी अपेक्षा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT