Aai Kuth Kay Karte Update Saam TV
मनोरंजन बातम्या

Arundhati Is Back : अरुंधती येताच अभिषेक-अनघामध्ये वाढला दुरावा

Aai Kuth Kay Karte Update : अभिषेक आणि अनघा यांच्या नात्यात दुरावा येत असल्याचे दिसत आहे.

Pooja Dange

Abhishesh-Angha Has Dispute : 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतीतील सर्व पात्र प्रेक्षक स्वतःशी रिलेट करतात. त्यातील आई म्हणजे अरुंधतीला तर समस्त आई वर्गाचा पाठिंबा आहे. मालिकेतील आई म्हणजे अरुंधती सध्या परदेशात गेल्याचे मालिकेत दिसत आहे. परंतु लवकरच अरुंधतीची पुन्हा मालिकेत एन्ट्री होणार आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती परदेशातून परतल्याने दिसत आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आशुतोष, अनिश, वीणा आणि सुलेखा ताई गप्पा मारत असतात. अरुंधतीला पाहताच अनिश, वीणा आणि सुलेखा ताई अरुंधती असं म्हणतात.

दाराकडे पाठ करून बसलेल्या आशुतोषला त्या तिघे त्याची थट्टा करत आहेत असे वाटते. आशुतोष न राहून दाराकडे पाहतो तर दारात अरुंधती उभी असते. तो धावत जाऊन अरुंधतीला मिठी मारतो. (Latest Entertainment News)

तर दुसरीकडे अभिषेक आणि अनघा यांच्या नात्यात दुरावा येत असल्याचे दिसत आहे. वटपौर्णिमेचे पूजा करण्यावरून अभिषेक आणि अनघा यांच्यात बोलणे सुरू असते. अभिषेक, अनघाला म्हणतो, 'तुझ्या मनात आपल्या नात्याविषयी अजूनही शंका असेल तर पूजेला बसू नको. मी आईशी बोलेन.' त्याला म्हणते, 'नाही नको मी कारेन पूजा.'

त्यानंतर अनघा छकुलीशी बोलत आहे की, 'हे सगळं मी तुझ्यासाठी करत आहे. मला अभिची जिक्ती गरज आहे ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त गरज तुला त्याची आहे. माझा निर्णय परत चुकला ना तर ताईबरोबर जे घडलं तेच माझ्याबरोबर घडेल.'

अरुंधती कुठे गेली होती?

आई कुठे काय करते या मालिकेत दाखविण्यात आले होते की अरुंधतीला गाण्यासाठी ऑस्ट्रेलियात बोलविण्यात आले होते. तिथे तिला तिची कला सादर करण्याची संधी मिळाली होती.

अरुंधती नसताना काय काय घडले?

अरुंधती परदेशी गेल्यानंतर जीवनात अयशस्वी आणि निराश झालेल्या यश आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आशुतोषने वडिलांचे कर्तव्य पार पडत त्याला वाचवले आणि त्याला धीर दिला.

देशमुखांच्या घरामध्ये चोर शिरला होता. कांचन आणि अण्णा दोघेच घरी असताना चोर घरात घुसला. तर कांचनने मदतीसाठी आशुतोषला फोन केला. तसेच तिथे एकटीने त्या चोराला प्रतिकार देखील केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT