Ashvini Mahangade Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashvini Mahangade: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने केला राजकरणात प्रवेश, म्हणाली " समाजासाठी काम करण्यासाठी... "

Ashvini Mahangade In NCP Sharad Pawar Party: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी महांगडेने राजकरणात प्रवेश केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनीने याबाबत माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी महांगडेने राजकरणात प्रवेश केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनीने याबाबत माहिती दिली आहे. अश्विनी महांगडेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

टिव्हीवरील 'आई कुठे काय करते', 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे राजकरणात उतरली आहे. अश्विनीने नुकतंच राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात अश्विनीने प्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील हे पक्षाचे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाक अश्विनीला महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारणी उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर अश्विनीने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने, 'माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देवून ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चा सुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे रक्तातच होते त्याच्या. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे.

पण साधारण 4 वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की ताई समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात 4 वर्षानंतर आज कोजागिरी पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल.

स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. मा. शरदचंद्र जी पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे,

मा. जयंत पाटील, मा. अमोल दादा कोल्हे, मा. बाळासाहेब पाटील, मा. शशिकांत शिंदे, मा. मेहबूब शेख तसेच माझ्यावर प्रचंड प्रेम करणारे आमचे मा. प्रसाद काका सुर्वे, मा. डॉ. नितीन सावंत, मा. राजकुमार पाटील, मा. बाबर, मा.संतोष पवार यांची ऋणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT