Actress Radha Sagar Blessed With Boy Instagram @radhasagarofficial
मनोरंजन बातम्या

Radha Sagar Good News: अभिनेत्री राधा सागरच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर फोटो केला शेअर

Radha Sagar Post: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री अंकिता म्हणजे राधा कुलकर्णीने आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Pooja Dange

Actress Radha Sagar Blessed With Baby Boy:

'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्री अंकिता म्हणजे राधा कुलकर्णीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. राधा कुलकर्णीला मुलगा झाला आहे. अभिनेत्रीने पोस्ट करत ही सुंदर बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे.

अभिनेत्री राधा कुलकर्णीने (राधा सागर) तिचा गरोदरपानाचा संपूर्ण प्रवास तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी म्हणजे २७ मे २०२३ला ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती.

राधा आणि तिचा पती सागर यांनी एक सुंदर व्हिडीओ पोस्ट करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर राधाने तिच्या डोहाळ जेवणाचे देखील फोटो शेअर केले होते.

नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राधाने तिच्या बाळाची झलक दाखवली आहे. राधाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण. आम्हाला मुलगा झाला हे. त्याच्या येण्याने आमच्या आयुष्यात एक वेगळा स्पार्क आला आहे. तो एखाद्या राजकुमारासारखा आहे. जीवनाच्या या नवीन मालिकेत आम्हाला आई आणि वडील म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद !!! आम्ही खरोखर धन्य पालक आहोत... राधासागर.' (Latest Entertainment News)

अभिनेत्री राधा सागरच्या या पोस्टला अभिनेता आणि तिचा सहकालकर अभिषेक देशमुखने लाईक केले आहे. तसेच अनेक फॅन्स त्यांचे अभिनंदन करत आहेत.

राधा 'आई कुठे काय करते' मालिकेतील अंकिताच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम केले. त्यानंतर तिने ब्रेक घेतला आणि राधा तिची प्रेगन्सी एन्जॉय करत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी जनतेला कोणतं वचन दिलं? दुष्काळावर काय म्हणाल्या?

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे स्वागत

Ilkal Saree Designs For Women: इल्कल साड्यांचे लेटेस्ट न्यू कलेक्शन, हे 5 पॅटर्न्स नक्की आवडतील

रोज न चुकता आवळ्याचा रस प्या, केस होतील लांबच लांब

Snoring : झोपेत का घोरतात? काय आहेत कारणे, ती किती गंभीर?

SCROLL FOR NEXT