Ashutosh Feel Disturb Because Of Arundhati Saam TV
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte 26 June Update : तुला आशुच्या प्रेमाची कदर नाही... भावाचे दुःख पाहून वीणाने अरुंधतीला सुनावले

Aai Kuthe Kay Karte Upcoming Episode : वीणा अरुंधतीवरचा राग व्यक्त करताना दिसणार आहे.

Pooja Dange

Ashutosh Feel Disturb Because Of Arundhati : 'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आशुतोषच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने केळकरांच्या घरातील सर्वच निराश आहेत. वीणाला देखील अरुंधतीचा खूप राग आलेला आहे. तर वीणा अरुंधतीवरचा राग व्यक्त करताना दिसणार आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कुठंच कमी पडत नाही. या मालिकेत सध्या अरुंधतीवर संपूर्ण केळकर कुटुंब नाराज असल्याच दिसत आहे. मालिकेत आशुतोषला 'बिझनेसमॅन ऑफ द इयर अवॉर्ड' मिळाला आहे.

पण या कार्यक्रमाला अरुंधती उपस्थित नव्हती. अरुंधती देशमुखांच्या घरी गेली होती. त्यामुळे आशुतोष खूप नाराज दिसत आहे. अनिश आणि नितीन आशुतोषला सावरायचा प्रसत्न करत आहेत पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.

अरुंधती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नसल्याने वीणा अरुंधतीवर रागावली आहे. तसेच ती तिचा राग नितीन आणि अनिशसमोर व्यक्त करत असते. रागाच्याभरात वीणा अरुंधतीला सुनावते. वीणा म्हणते, "आज आशु आणि आई दोघांनीही दुखावलय तिने". तेवढ्यात अरुंधती येते आणि आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. (Latest Entertainment News)

अरुंधती म्हणते, "असं काही नाही आहे, आजचा दिवस आशुतोसाठी किती महत्तवाचा होता, हे मला माहित आहे.मलाही त्यांच्यासाठी तिथे उपस्थित राहायची खूप इच्छा होती. पण मला देशमुखांकडून निघायला नाही जमलं".

वीणा मात्र तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. त्यावर वीणा म्हणते, "का? का निघू शकली नाही? इथून तिथे जायचं म्हटलं की एका पायावर तयार असते.पण तिथून इथे परत यायचं म्हटल की,तुझा पाय निघत नाही. सॉरी! अरुंधती मी जे बालते त्याचं तुला वाईट वाटेल, पण कोणीतरी तुला हे सांगणं महत्तवाचं आहे.

ते घर ना तुझं माहेर आहे ना सासर. ते तुझं घर नाहीय. हे तुझं घर आहे. तू सारखं सारखं तिकडे जाऊन दोन्ही घरांचा बॅलेन्स बिघडवते. आशु तुला कधीच याबद्दल काहीच बोलणार नाही. कारण तो तुझ्यावर इतकं प्रेम करतो ना की तो तुला शब्दानेही दुखावणार नाही. नेहमीप्रमाणे स्वतः चा राग नाराजी गिळून गप्प बसेल तो".

वीणा अरुंधतीला कार्यक्रमात आशुतोष किती नाराज होता याबद्दल सांगते, "अवॉर्ड घ्यायला जेव्हा तो स्टेजवर गेला तेव्हा हजारो लोक त्याच्यासाठी टाळ्या वाजवत होते. सगळे त्याचं भरभरुन कौतुक करत होते. पण त्याला गरज होती फक्त तुझ्या दोन शब्दाची, तुझ्या सोबतीची.

त्याची नजर फक्त तुला शोधत होती. पण तु तिथे नव्हतीस. अवॉर्ड मिळालेला प्रत्येकजण भरभरुन बोलत होता. आशुसुद्धा त्याचं स्पीच घरातून तयार करुन घेऊन गेला होता. पण तो स्टेजवर जाऊन काय बोलला माहितीये तुला, थॅंक्यु. बस्स... सगळ्यांचे आभार मानले आणि तिकडून निघून गेला".

नितीन वीणााला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण वीणा काही थांबत नाही. ती म्हणतो "त्याने असं का केलं असेल अरुंधती. कारण त्याला ते भाषण जगाला ऐकवायचं नव्हतं. त्याला इतर लोकांसमोर आपलं मन मोकळ करायचं नव्हतं कारण तो जे बोलणार होता ते तुझ्याबद्दल होतं अरुंधती.

तुझ्यासाठी होतं. तुला याची काहीच कल्पना नाही. कारण हे ऐकायला तु तिथे नव्हतीच. तुझं आता लग्न झालय आशुशी तू त्याची बायको आहे. तुझी मुलं काय लहान बाळ नाही की तुला उठ सुट तिथे जाव लागत. ती मोठी झाली आहेत आता. त्यांना तुझी गरज नाहीये. सॉरी टू से अरुंधती पण तुला आशुच्या प्रेमाची कदर नाहीये". तिच्या या शब्दांनी अरुंधतीला मात्र प्रचंड वाईट वाटतं.

अरुंधती वीणाला समजावण्याचा प्रयत्न करते, ती म्हणते, "तुझा काहीतरी गैरसमज होतोय.आज तिथे काय घडलं मी का येऊ शकली नाही हे तुला माहित नाही आहे. मी तिथे नसती ना आज तर... माझ्या मुलाला आज माझी जास्त गरज होती. म्हणून मी तिथे होती.

आशुतोषच्या अवॉर्ड फंक्शनला उपस्थित राहू शकले नाही याच माझ्याएवढं जास्त वाईट दुसऱ्या कोणालाच वाटत नसेल .यावर वीणा अरुंधतीला अवॉर्ड फक्शंनला का नाही आलीस याचा जाब विचारते. त्यावर अरुंधती म्हणते, "यासाठी काहीतरी कारण आहे. पण तुला ते ऐकुनच घ्यायाच नाही आहे".

यानंतर वीणा अरुंधतीला म्हणते, "मी इथे आल्यापासून एक गोष्ट नोटीस केली आहे, काहीही झालं ना तरी आई कायम तुझी बाजू घेते पण आज तीसुद्धा तुझ्यावर नाराज आहे. थोडा विचार कर याबद्दल." वीणाच्या या बोलण्याने अरुंधतीला खूप वाईट वाटतं.

वीणाच्या या बोलण्याने अरुंधतीला खूप वाईट वाटतं. आता अरुंधती आशुतोषला कसं मनवते हे पाहण उत्सुकतेच ठरणार आहे. आशुतोषच्या आईचा अरुंधतीवरचा राग निवळणार का? त्यांचा राग घालवण्यासाठी अरुंधती काय प्रयत्न करणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT