Rupali Bhosle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rupali Bhosle: दिवाळीच्या शुभमुहूर्तावर'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कोरी कार; Video शेअर करत म्हणाली...

Rupali Bhosle Bought A Car: रूपालीने नुकतंच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तीवर रूपालीने अलिशान कार खरेदी केली आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले सध्या चर्चेत आहे. रूपालीने आजवर अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. रूपाली सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत रूपाली संजनाच्या भूमिकेत आहे. रूपालीने नुकतंच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तीवर रूपालीने अलिशान कार खरेदी केली आहे.

रूपालीने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. रूपालीने नवीकोरी अलिशान कार खरेदी केली आहे. रूपाली संपूर्ण कुटुंबासह कारची पूजा केली आहे. तसेच केक देखील कापला आहे. रूपाली मराठमोळ्या अंदाजात फारच सुंदर दिसत आहे. व्हिडीओला रूपालीने "आमच्या घरी स्वागत आहे आणि कारचा इमोजी" असं कॅप्शन दिला आहे.

सोशल मीडियावर रूपालीच्या व्हिडीओवर सेलिब्रिटीसह चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर एका नेटकऱ्याने, एक स्त्री आपल्या घरासाठी खूप काही करू शकते, अभिनंदन, वाह खूप छान आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

याचवर्षी जून महिन्यात अभिनेत्री रुपाली भोसलेने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. या घराची वास्तुशांती तिने पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात केली. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Bath Tips: थंडीत गरम पाण्याने की थंड पाण्याने अंघोळ करणं योग्य आहे?

Shocking: मुंबई हादरली! निवृत्त जवानाकडून १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता २ महिन्यांची गरोदर

Samruddhi Mahamarg : धक्कादायक! एकीकडे पाय, दुसरीकडे तोंड; समृद्धी महामार्गा लगत आढळला २ तुकड्यात मृतदेह

Rava Kesari Halwa Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं? बनवा हॉटेल स्टाईल सॉफ्ट टेस्टी रवा केशर हलवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

SCROLL FOR NEXT