Urvashi Rautela Saam Tv
मनोरंजन बातम्या

सिधी बात नो बकवास…; उर्वशी रौतेलाने मागितली रिषभ पंतची माफी

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतची माफी मागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) आणि भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत(Rishabh Pant) यांच्यातील वादाचे अनेक किस्से सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांमधील इंटरनेट वॉरही एकापाठोपाठ एक चर्चेत आले आहे. दरम्यान, या रहस्यमय कथेत एक ट्विस्ट समोर आला आहे, हा गमतीशीर ट्विस्ट जाणून चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये उर्वशी क्रिकेटपटू रिषभ पंतची माफी मागत आहे. जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओचे संपूर्ण सत्य नक्की काय आहे?

अलीकडेच, उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी "सिद्धी बात नो बकवास... रिषभ मला माफ करा..." असे म्हणताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच, यावर यूजर्सच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने हात जोडले आहेत. ज्यावर लोक कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, 'तो आता लाइनवर आला आहे'. त्याचवेळी दुसऱ्या युजरने 'गोलमाल है भाई सारे गोलमाल है' असे लिहिले. इतकंच नाही तर एका यूजरने अभिनेत्री खोटी असल्याचंही लिहिलं असून, ती खोटं बोलली आहे, त्यामुळे ती माफी मागत आहे अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT