मनोरंजन बातम्या

AR Rahman And Saira Banu Divorce: प्रसिद्ध संगीतकाराचा २९ वर्षाचा संसार मोडला; ए आर रहमान आणि सायरा बानू यांचा घटस्फोट

AR Rahman And Saira Banu Divorce: प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए आर रहमान हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए आर रहमान हे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानू यांनी वैवाहिक आयुष्यात वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. २९ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे चाहतेही चिंतेत पडले आहेत.

सायरा बानू व ए आर रेहमान यांच्या वकिल वंदना शाह यांनी या दोघांच्या निर्णयाचं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी, "श्रीमती सायरा आणि त्यांचे पती प्रख्खात संगीतकार अळ्लाहक्का रहमान या दोघांच्या वतीने आणि त्यांच्या सूचनेनुसार, वंदना शाह आणि असोसिएट्स या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल निवेदन देत आहेत."

"लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर सायरा यानी ए आर रेहमानपासून वेगळं होण्याचा हा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर घेतला आहे. या जोडप्याचं एकमेकांवर प्रेम असूनही त्यांच्या नात्यात तणाव आणि अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी कोणालाही दूर करता येणार नाही असं सायरा म्हणाली आहे. आव्हानात्मक आणि कठीण काठात समजूदपणा दाखवून सर्वांनी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती सायरा यांनी सर्वांना केली आहे." कारण, आयुष्यातील कठीण काठातून त्या सध्या जात आहेत असं त्यांनी त्या निवेदनपत्रात म्हटलं आहे. ए आर रहमान आणि सायरा यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता. या दोघांना खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत.

ए आर रहमान यांची पोस्ट

ए आर रहमान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्नानंतर 30 वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकतं. असं असताना देखील आपण अर्थ शोधत असतो… आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’, ए. आर. रहमान यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही ७ गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT