Raj Thackeray  saam tv
मनोरंजन बातम्या

Raj Thackeray: 'बाळासाहेबांचा राज' लवकरच तुमच्या भेटीला, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी होणार पहिला प्रयोग

राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कलाकृती लवकरच पाहायला मिळणार आहे.

Pooja Dange

Balasahebancha Raj New Play: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कलाप्रेमी आहेत. राज ठाकरे नेहमीच कलाकारांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक करतात. राज ठाकरे यांच्या या प्रेमाविषयी त्यांचे महाराष्ट्र सैनिक देखील जाणून आहेत. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन अंकी मराठी नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. आता राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कलाकृती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्मित या नाटकाचे नाव 'बाळासाहेबांचा राज' असे आहे. या नाटकाची निर्मिती अनिकेत बंदरकर एंटरटेनमेंटकडून करण्यात आली आहे. तसेच याचे लेखन आणि दिग्दर्शन अनिकेत बंदरकर यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी म्हणजे २३ जानेवारीला या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे दुपारी ४:३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

'बाळासाहेबांचा राज' या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर भगवा रंगात आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिकृती दाखविण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासमोर हातात झेंडे घेऊन शिवसैनिक उभे आहेत. बॅकग्राउंडला देखील बाळासाहेबांचा फोटो दाखविण्यात आला आहे. पोस्टरच्या दोन्ही बाजूंना मस्जिद दाखविण्यात आली आहे.

बाळासाहेबांचा राज पोस्टर

प्रमोद गांधी प्रस्तुत या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT