Ali Asgar  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhalak Dikhla Jaa 10: अली असगर रातोरात शोमधून बाहेर, कारण जाणून चाहत्यांना बसला धक्का !

'झलक दिखला जा १०' शो सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी अली असगरला या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये आजीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला कॉमेडियन अली असगर सध्या 'झलक दिखला जा १०'( Jhalak Dikhla Jaa 10) या रिअॅलिटी डान्स शोमध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवत आहे. पण आता अशा बातम्या समोर येत आहेत की शो सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी अली असगरला या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अली असगरचा(Ali Asgar) शोमधून बाहेर पडणे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, परीक्षकांनी अली असगर आणि जोरावर कालरा यांना सारखे वोट दिले. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी दोघांनसाठी वोटिंग केले. लोकांच्या मतांच्या आधारे कोण शोमधून बाहेर पडणार आणि कोण शोमध्ये राहणार हे ठरले. वोटिंगनुसार जोरावर कालराला अली असगरपेक्षा जास्त मत मिळाले आणि अलीला शो सोडावा लागला.

मीडिया रिपोर्टनुसार, अली असगर बाहेर पडल्यानंतर खूप भावूक झाला होता. निघताना सगळ्यांशी बोलताना अली असगर म्हणाला, 'मी एक कलाकार आहे. आजीची भूमिका करायची की डान्स. एक अभिनेता म्हणून मी नेहमीच प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटला आहे. हा शो सोडल्यानंतर मी खूप भावूक झालो आहे. पण या शोमधून मला एक नवी ओळख मिळाली याचा मला आनंद आहे. कलर्सने ही संधी दिली आणि लिप्साने पाठिंब्याबद्दल तिचे आभार.'

या शोदरम्यान अली असगरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासेही केले. अली असगरने शोमध्ये सांगितले होते की, मुलीची भूमिका करतो म्हणून शाळेत त्याच्या मुलांची खिल्ली उडवली जात होती. यासोबतच त्याला खूप ट्रोलही केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

Sunday Horoscope : व्यवसायात लाभ होईल, 6 राशींच्या व्यक्तींचा रविवारचा दिवस कसा असणार? वाचा संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT