manisha koirala Google
मनोरंजन बातम्या

Manisha Koirala On Relationship: मनीषा कोईराला ५४ व्या वर्षात कोणाला करतेय डेट?

Manisha Koirala: ९० च्या दशकातील अभिनेत्री मनीषा कोइराला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता मनीषाने आपल्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा करत चाहत्यांना आश्चर्य चकित केलं आहे.

Shruti Vilas Kadam

Manisha Koirala: ९० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री मनीषा कोइराला तिच्या सौंदर्य आणि चित्रपटांमुळे अनेकदा चर्चेत असते. याचसह काही दिवसांपासून अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी ती अविवाहित आहे का की तिच्या आयुष्यात कोणी खास आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण मनीषा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे क्वचितच टाळते विशेषतः प्रेम जीवनाबद्दल. पण, अलिकडेच एका मुलाखतीत मनीषाला तिच्या जोडीदाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यावर तिने स्पष्ट उत्तर दिले आहे.

खरंतर, मनीषा कोईरालाला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तिचा कोणी जोडीदार नाही असे कोणी म्हटले आहे. अभिनेत्रीने पुढे टाळाटाळ करत हो आणि नाही असे दोन्ही उत्तर दिले आणि कोण म्हणालं मी एकटी असल्यावर सुखात जगू शतक नाही. पुढे मनीषा म्हणाली की तिला ती कोण आहे आणि तिचे आयुष्य काय आहे हे समजले आहे. मनीषा तिच्या जोडीदाराबद्दल पुढे म्हणाली की जर तिच्या आयुष्यात कोणीतरी येण्यामुळे ती कोणतीही तडजोड करणार नाही. ती म्हणते की जर तिचा साथीदार तिच्यासोबत येऊ शकला तर तिला खूप आनंद होईल.

मनीषा कोईराला सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे

यासोबतच, मनीषा कोईरालाने तिच्या सिंगल लाईफबद्दल पुढे सांगितले जर कोणी तिच्या आयुष्यात यायचे असेल तर तो येईल. सध्या ती तिचे चांगले आयुष्य जगत आहे. ती म्हणाली की तिला भविष्यातही असेच जीवन जगण्याची आशा आहे. अभिनेत्री म्हणते की तिला तिचे आयुष्य अशा प्रकारे जगायला आवडेल.

दरम्यान, जर आपण मनीषा कोईरालाच्या लग्नाबद्दल बोललो तर तिचे पहिले लग्न २०१० मध्ये झाले होते. तिने एका नेपाळी व्यावसायिकाशी लग्न केले. दोघांचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, जेव्हा अभिनेत्रीला कर्करोगाची माहिती मिळाली तेव्हा तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला. मनीषाच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती शेवटची संजय लीला भन्साळींच्या हिट वेब सीरिज 'हीरामंडी' मध्ये दिसली होती. या मल्टीस्टारर मालिकेतील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

Health Tips - सकाळी उठल्याबरोबर किंवा जेवणानंतर लगेच चहा पिताय? तुमच्या या सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात

Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पुणे पोलिस दलात खळबळ

Maharashtra News Live Update: दिल्लीत CM फडणवीसांनी घेतली अमित शाहांची भेट

प्रत्येक एफआयर माझ्यासाठी एक पदक! राहुल गांधी खासदारांसोबत जंतर-मंतरकडे रवाना| Video

SCROLL FOR NEXT