100th Natya Sammelan Saam Tv
मनोरंजन बातम्या

100th Natya Sammelan: बाईक रॅली, रथ अन् नाट्ययात्रा; शिवराज्यभिषेक सोहळा सादर करत शंभराव्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ

Natya Sammelan: शंभराव्या नाट्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात अनेक कला सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंग सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवराज्यभिषेक सोहळा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

100th Natya Sammelan:

शंभराव्या नाट्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात अनेक कला सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंग सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवराज्यभिषेक सोहळा. शिवराज्यभिषेक सोहळ्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

या सोहळ्याला पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील आजरामर अशा १०० कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा यावेळी सादर केल्या होत्या. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य 'शिवराज्याभिषेक सोहळा' शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण ठरले. (Latest News)

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात शुक्रवारी पार पडला. यावेळी बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नाट्य यात्रा काढण्यात आली. या भव्य नाट्य यात्रेत ५०० दुचाकी, १० रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि १०० विविध नाटकांमधील १०० व्यक्तिरेखांचा समावेश होता. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे शाखेचे विजय पटवर्धन, दीपक रेगे यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि अनेक सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे रंगमंच पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT