Ahmednagar News Saam Tv
क्राईम

Ahmednagar News: अनैतिक संबंधाच्या संशयातून घात झाला, २८ वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या; कोपरगावमध्ये खळबळ

Youth Killed In Kopargaon Suspicion Of Immoral Relationship: अनैतिक संबंधाच्या संशयातून कोपरगावमधील तरूणाची हत्या झालीय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Rohini Gudaghe

सचिन थोरात, साम टीव्ही अहमदनगर

कोपरगावमध्ये एका २८ वर्षीय तरूणाची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. या तरूणाची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचं वातावरण असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर तीनजण फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या

कोपरगाव (Ahmednagar) शहरात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली. सोहेल हारून पटेल (२८ वर्षीय), असं निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन आरोपी ताब्यात तर तिघेजण फरार आहेत. मृत तरूणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलेला (Youth Killed In Kopargaon) आहे.

कशी घडली घटना?

आरोपींना मृत तरूणावर अनैतिक संबंधाचा संशय होता. त्यामुळे त्यांनी सोहेल पटेलचं काल २१ जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अपहरण केलं होतं. अपहरण केल्यानंतर आरोपींनी सोहेलला जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये सोहेलचा मृत्यू झालाय. मृताच्या नातेवाईकांनी हत्येनंतर पोलीस ठाण्यात धाव (Youth Killed) घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यासमोरचं ठाण माडलं आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केलीय. या घटनेमुळे कोपरगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील घटना

पुण्यात एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी मध्यरात्री (crime news) घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपींना अटक केलीय. हडपसर येथील रामटेकडी परिसरात घडल्याची माहिती मिळतेय. फरहान अब्दुल रज्जाक शेख असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी फरहानचा भाऊ फरीद शेख याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

SCROLL FOR NEXT