Man Attacks Sleeping Wife with Axe  Saam tv
क्राईम

Crime News: चारित्र्याच्या संशयाचे भूत डोक्यात गेले, झोपेत असलेल्या बायकोवर कुऱ्हाडीने वार; यवतमाळ हादरले

Man Attacks Sleeping Wife with Axe: यवतमाळमध्ये नवऱ्याने झोपेत असलेल्या बायकोवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर कुऱ्हाडीने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळच्या घाटंजी येथील नेहरूनगरमध्ये सोमवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आरोपी नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. प्रफुल्ल गौतम टिपले (वय ४० वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. प्रफुल्लने बायकोच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यवतमाळच्या घाटंजी येथे ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून आणि चारित्र्यावर असलेल्या संशयावरून नवऱ्याने झोपेत असलेल्या बायकोच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे.

ही घटना सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काजल प्रफुल टिपले (वय २५ वर्षे) असं जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुर्गेश अरुण कुंभारे (वय २४ वर्षे) याच्या तक्रारीवरून आरोपी प्रफुल्लविरोधात घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या तक्रारीनुसार दुर्गेशला रात्री २.१५ वाजता त्याचा मित्र सौरभ पाटीलचा फोन आला आणि गाडी घेऊन नेहरुनगरमधील मामा प्रफुल टिपले यांच्या घरी लवकर ये असे सांगण्यात आले. मामाने मामीला कुऱ्हाडीने मारले असे त्याने फोनवर सांगितले. त्यावरुन दुर्गेश हा प्रफुल टिपले यांच्या घरी गेला असता त्याला लोकांची गर्दी दिसली. त्याचा मित्र सौरभ, त्याची आई आणि मामा हे गंभीर जखमी असलेल्या त्याच्या मामीला धरुन बसलेले होते.

दुर्गेश आणि सौरभने काजल यांना दुचाकीवर बसवून घाटंजी येथील रुग्णालयात नेले. तेथे डाक्टरांनी प्रथमोपचार करुन त्यांच्या गळ्यावर गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचाराकरीता शासकीय रुग्णालय यवतमाळ येणे रेफर केले. त्यामुळे सौरभ आणि त्याच्या आईने काजलला यवतमाळ येथे नेले. त्यानंतर दुर्गेशने घाटंजी पोलिस ठाणे गाठून प्रफु्लल गौतम टिपले विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT