Husband And Wife Domestic Dispute Saam tv
क्राईम

Yavatmal Crime: वाद गेला टोकाला अन् मोडली सात जन्माची शपथ; पत्नीवर केला लोखंडी रॉडचा वार

Husband And Wife Domestic Dispute: यवतमाळ शहरात घरगुती वादातून नवरा बायको मध्ये कडाक्याचे वाद झाला. या वादातून पतीने पत्नीवर रॉडने हल्ला करत तिची हत्या केली.

Bharat Jadhav

नवरा-बायको म्हटलं की वाद, भांडणं होतच असतात. वादविवाद शिवाय घरपण नसतं. पण वाद टोकाला गेले की, सुखी जोडप्याला नजर लागते. यवतमाळमध्येही क्षुल्लक कारणावरून झालेल्या नवरा बायकोच्या वादाने टोक गाठलं आणि नवऱ्यानं पत्नीचा जीव घेतला. ही घटना शहरातील गाडगे नगर परिसरात घडली.

घरगुती वादातून नवरा बायकोमध्ये कडाक्याचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली. शालू अमित शास्त्रकार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रवीण उर्फ अमित शास्त्रकार असे मारेकरी पतीचे नाव आहे.

आधी पत्नीवर हल्ला नंतर पोलिसांना गेला शरण

अमित आणि पत्नी शालू या दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला, त्यातून पत्नीची हत्या झाली. पती अमितला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्यात शालू गंभीरित्या जखमी झाली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेनंतर मारेकरी पती स्वतःहून पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी मारेकरी अमितला ताब्यात घेतलंय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT